ETV Bharat / bharat

Jallikattu In Chennai : इतिहासात प्रथमच चेन्नईत रंगणार जल्लीकट्टू! - चेन्नईत जल्लीकट्टू

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नई येथे जल्लीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चेन्नईपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या पडप्पई येथे द्रमुक तर्फे जल्लीकट्टू स्पर्धा आयोजित केली जाईल.

Jallikattu
जल्लीकट्टू
author img

By

Published : Jan 11, 2023, 10:32 PM IST

चेन्नई : तुम्हाला चेन्नईला जायचे आहे का? मग 5 मार्च ही चेन्नईला जाण्यासाठी योग्य तारीख आहे. तुम्हाला माहीत आहे का? दक्षिण तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेल्या जल्लीकट्टू स्पर्धा प्रथमच चेन्नईमध्ये होणार आहेत. मदुराईमध्ये अलंकनाल्लूर आणि पलामेडू सारखी जगप्रसिद्ध जल्लीकट्टू फील्ड आहेत. 2017 मध्ये, चेन्नईमध्ये तरुणांनी जल्लीकट्टूचा निषेध केला होता. मात्र आता राजधानी चेन्नईतही बैलांचा दणदणाट ऐकू येणार आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन : तामिळनाडूचे ग्रामीण उद्योगमंत्री था.मो.अनबरसन यांनी याबाबत एक घोषणा केली आहे. ते चेन्नईच्या अलंदूर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी काल प्रसारमाध्यमांची भेट घेतली आणि एक महत्त्वाची घोषणा केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त चेन्नई येथे जल्लीकट्टू स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. चेन्नईपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या पडप्पई येथे द्रमुक तर्फे जल्लीकट्टू स्पर्धा आयोजित केली जाईल. यामध्ये 500 बैल सहभागी होतील, अशी घोषणा त्यांनी केली. यात तामिळनाडूचे सर्वोत्तम बैल आणि खेळाडू सहभागी होतील, असेही ते म्हणाले. एम.के.स्टालिन यांच्या नावाने बैल सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

खेळाडूंसाठी विमा : मंत्र्यांनी जाहीर केले आहे की, पहिल्यांदाच 'खेळाडूंसाठी विमा' दिला जाईल. प्रथम आलेल्या बैलाला कार आणि प्रथम येणाऱ्या खेळाडूस मोटारसायकल देण्यात येणार आहे. मो.अनबरासन म्हणाले की, आम्ही जल्लीकट्टू प्रिझर्वेशन सोसायटीच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार करत आहोत, ज्यांनी यापूर्वी अनेक जल्लीकट्टू स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

10 हजार लोक येऊ शकतात : था.मो. अनपरसन म्हणाले की, हे सामने पाहण्यासाठी दहा हजार लोक येणे अपेक्षित असून त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जातील. त्यासाठीचे काम महिनाभरापूर्वीच सुरू झाले असून दोन महिने बाकी असल्याने आवश्यक ती व्यवस्था पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या वर्षी स्पर्धा घेण्याचे नियोजन केले होते मात्र कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ते होऊ शकले नाही. ते म्हणाले की, यावर्षी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होणार आहे.

हे ही वाचा : तामिळनाडूत पुन्हा रंगणार 'जलीकट्टू'चा थरार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.