ETV Bharat / bharat

तेलंगणाच्या राजकारणात येण्याचे जगनमोहन यांची बहीण शर्मिला यांचे संकेत..

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शर्मिला या तेलंगणाच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जनगमोहन यांच्या मदतीशिवाय, स्वंतत्रपणे त्या तेलंगणामध्ये राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचा तर्क लोकांमधून केला जात आहे. त्या वायएसआर यांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. शर्मिला यांनी मात्र यांपैकी कोणत्याही गोष्टीची पुष्टी केली नाही...

Jagan's sister Sharmila hints at entering Telangana politics
तेलंगणाच्या राजकारणात येण्याचे जगनमोहन यांची बहीण शर्मिला यांचे संकेत..
author img

By

Published : Feb 9, 2021, 6:59 PM IST

हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांची बहीण वाय. एस. शर्मिला या तेलंगणाच्या राजकारणात उडी घेण्याची शक्यता आहे. मंगळवारी नालगोंडामधील काही नेत्यांची भेट त्यांनी घेतली होती, यानंतर याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे.

आंध्र प्रदेशचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी (वायएसआर) हे जगनमोहन आणि शर्मिला यांचे वडील. २००४ ते २००९पर्यंत ते आंध्रचे मुख्यमंत्री होते. २००९मध्ये एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या हितचिंतकांसोबत आज शर्मिला यांनी चर्चा केली.

चर्चांना उधाण, मात्र शर्मिला यांचे मौन..

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शर्मिला या तेलंगणाच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. जनगमोहन यांच्या मदतीशिवाय, स्वंतत्रपणे त्या तेलंगणामध्ये राजकीय पक्ष सुरू करणार असल्याचा तर्क लोकांमधून केला जात आहे. त्या वायएसआर यांच्या निकटवर्तीय काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही बोलले जात आहे. शर्मिला यांनी मात्र यांपैकी कोणत्याही गोष्टीची पुष्टी केली नाही. आजच्या बैठकीबाबत त्या म्हणाल्या, की "नालगोंडा जिल्ह्यातील स्थानिक प्रश्न समजून घेण्यासाठी मी या लोकांना बोलावले होते. ही केवळ एक साधारण बैठक होती."

तेलंगणामध्येही 'वायएसआर शासन' येण्याची इच्छा..

नालगोंडामध्ये कित्येक ठिकाणी शर्मिला आणि वायएसआर यांचे फोटो असणारे बॅनर उभारण्यात आले आहेत. मात्र, या सर्व बॅनर्सवरुन जगनमोहन यांचा फोटो मात्र गायब आहे. आदिलाबादच्या उतनूरमधील एका वायएसआर काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले, की तेलगंणामध्येही वायएसआर यांचे प्रशासन यावे अशी येथील कित्येक नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेलंगणामध्ये वायएसआर पक्षाचे अस्तित्व असूनही, त्यांनी गेल्या सर्वसाधारण निवडणुकांमध्ये सहभाग नोंदवला नव्हता.

जनगमोहन यांच्यासाठी केला होता मोठा प्रचार..

शर्मिला आणि त्यांची आई विजयम्मा यांनी २०१९मधील सर्वसाधारण निवडणुकांवेळी वायएसआर काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. यामध्ये प्रचंड बहुमताने जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला विजयही मिळाला होता. त्यानंतर मात्र या दोघी सार्वजनिक जीवनामध्ये जास्त दिसल्या नाहीत.

हेही वाचा : बोगस मतदान रोखण्यासाठी बंगाल विधानसभा निवडणुकीत अ‌ॅपचा वापर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.