जबलपूर MSc Degree In 23 attempts : मध्य प्रदेशातील जबलपूर येथे दुकानात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या राज किरण बरुआ यांनी सतत २६ वर्ष प्रयत्न करून एमएसस्सी (M.Sc.) पदवी संपादन केली आहे. राज किरण यांनी १९९६ मध्ये जबलपूरच्या राणी दुर्गावती विद्यापीठात एमएएमएससी (M.A. M.Sc.) साठी प्रवेश घेतला होता. त्यांनी १९९७ ते २०२१ असा २३ वेळा प्रयत्न केला, परंतु ते एम एस्सी प्रथम वर्ष पास होऊ शकले नाही. २०२१ मध्ये त्यांनी २४ व्या प्रयत्नात प्रथम वर्ष पास केलं. त्यानंतर २५ व्या प्रयत्नात त्यांनी एम एस्सी फायनल परीक्षा पास केली. आज त्यांच्याकडे एम एस्सीची पदवी आहे!
वडील मजूर म्हणून काम करायचे : जबलपूरच्या राज किरण बरुआ यांची कथा ही संयम आणि समर्पणाची कहाणी आहे. त्यांचे आई-वडील खूप गरीब होते. ते मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून जबलपूरला आले. राज किरण यांचे वडील जबलपूरमध्ये मजूर म्हणून काम करायचे. मात्र वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं आणि त्यानंतर त्यांची आई मोलकरीण म्हणून काम करू लागली. राज किरण यांची बुद्धी कुशाग्र होती. त्यामुळे लोक त्यांना अनेकदा सांगत, तू अभ्यास कर, तुझं भविष्य उज्ज्वल होईल.
पुरातत्त्व विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण : राज किरण यांनी जबलपूर येथील नवीन विद्या भवन शाळेतून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. काही दिवसांनी त्यांच्या आईचंही निधन झालं. त्यानंतर त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं. त्यामुळे त्यांनी बंगले आणि दुकानांमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्यास सुरुवात केली. याद्वारे त्यांना राहण्यासाठी पुरेसे पैसे मिळाले. मात्र अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. असं असूनही, त्यांनी १९९६ मध्ये पुरातत्त्व विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. जोडीला ते मुलांचे शिकवणी वर्गही घेत राहिले.
२३ वेळा प्रयत्न : राज किरण बरुआ यांना एमएस्सी पदवी घ्यायची इच्छा होती. यासाठी त्यांनी १९९६ मध्ये राणी दुर्गावती विद्यापीठात एम ए एम एस्सी (M.A. M.Sc.) साठी प्रवेश घेतला. १९९६ ते २०२३ पर्यंत राज किरण बरुआ यांनी एम एस्सीसाठी २३ वेळा प्रयत्न केले होते. परंतु त्यांना यश मिळत नव्हतं. कोविड महामारीच्या काळात त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी एम एस्सीचं पहिलं वर्ष उत्तीर्ण केलं. २०२३ मध्ये ते एमएस्सीचं द्वितीय वर्ष उत्तीर्ण झाले.
अनेकांनी केली चेष्टा : या काळात राज किरण बरुआ यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. उदरनिर्वाहासाठी ते ज्या बंगल्यात आणि दुकानात गार्ड म्हणून काम करत असत, तेथील मालक अनेकदा त्यांची चेष्टा करायचे. मात्र असं असूनही त्यांनी धीर न सोडता आपले प्रयत्न चालूच ठेवले. राजकुमार सांगतात की, एकदा युनिव्हर्सिटीच्या रजिस्ट्रारनं त्यांना अभ्यास थांबवण्यास सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांनी हार खाल्ली नाही आणि एमएस्सीची पदवी संपादन केली.
नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करण्याची इच्छा : राज किरण बरुआ सांगतात की, ते इतक्या वेळा नापास झाले आहेत की, आता त्यांना नापास होण्याची भीती वाटत नाही. आता त्यांना नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत काम करायचं आहे. सतत प्रयत्न करूनही नापास होणाऱ्या मुलांचं मानसशास्त्र त्यांना समजलंय. संधी मिळाल्यास अशा मुलांचा अभ्यास करून त्यांना मानसिक पातळीवर मदत करायची असल्याचं राज किरण बरुआ यांनी सांगितलं.
हेही वाचा :