ETV Bharat / bharat

Isudan Gadhvi AAP : इसुदान गढवी AAP चे गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, केजरीवाल यांची घोषणा - 150 कोटींचा घोटाळा उघडकीस

गुजरात निवडणुकीसाठी इसुदान गढवी हे AAP चे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे.

इसुदान गढवी
इसुदान गढवी
author img

By

Published : Nov 4, 2022, 2:31 PM IST

Updated : Nov 4, 2022, 3:19 PM IST

नवी दिल्ली - गुजरात निवडणुकीसाठी इसुदान गढवी हे AAP चे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनी केली आहे. या घोषणे नंतर आपच्या गुजरातमधल प्रचाराला आता आणखी जोर येणार आहे.

केजरीवाल यांनी लोकांना एसएमएस, व्हॉट्सअप, व्हॉइस मेल आणि ई-मेलद्वारे पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री उमेदवार कोण असावा हे त्यांना कळवा असे आवाहन त्यातून करण्यात आले होते. त्यांनी लोकांना 3 नोव्हेंबरपर्यंत त्यांचे मत देण्यास सांगितले होते. ज्याच्या आधारावर पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार 4 नोव्हेंबरला जाहीर केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले होते.

ख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील आप - पक्षाच्या सूत्रांनी सांगितले होते की, मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील आप नेत्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया, राष्ट्रीय सरचिटणीस इसुदान गढवी यांचा समावेश आहे. सरचिटणीस मनोज सोरथियानो यांचाही त्यामध्ये समावेश आहे. केजरीवाल शुक्रवारी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा करतील असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्रीपदाच्या आपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत इसुदान गढवी - एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले इसुदान गढवी पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर राजकारणात आम आदमी पार्टी (आम आदमी पार्टी गुजरात) चे महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 10 जानेवारी 1982 रोजी जामखंभलियाच्या पिपलिया गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खेराजभाई. ते स्वतः व्यवसायाने शेतकरी होते. इसुदान गढवी (isudan gadhvi aap) यांनी जामनगरमधील त्यांच्या गावी आणि महाविद्यालयात शिक्षण पूर्ण के.ले नंतर वडिलांच्या इच्छेनुसार पत्रकारितेसाठी अहमदाबादला आले.

गुजरात विद्यापीठात पत्रकारितेचे धडे - लहान गावातून येऊन अहमदाबादसारख्या शहरात राहणे सोपे नाही. पण इसुदान गढवी (isudan gadhvi aap) यांनी अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठात येऊन पत्रकारितेचा अभ्यास केला. त्यावेळी विद्यापीठातील विद्यार्थी समस्या घेऊन कुलपतींकडे जाऊ शकणारे एकमेव विद्यार्थी म्हणून त्यांना विद्यार्थी नेता करण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या वडिलांचेही स्वप्न होते की तो मोठा झाल्यावर पत्रकार बनण्याची इच्छा पूर्ण करील. 2014 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. परंतु त्यांच्या वडिलांनी सांगितले होते की, आयुष्यात काहीही झाले तरी ते पत्रकारिता कधीच सोडायची नाही. दक्षिण गुजरातमधील एका खासगी वाहिनीवरून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली.

150 कोटींचा घोटाळा उघडकीस - पत्रकारितेच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात 150 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यात त्यांची मोठी कामगिरी होती. इसुदान गढवी यांनी 'योजना' या लोकप्रिय दूरदर्शन शोमध्ये काम केले. 2007 ते 2011 पर्यंत त्यांनी ईटीव्ही न्यूज गुजरातीसाठी पोरबंदरमध्ये फील्ड रिपोर्टर म्हणून काम केले. त्यांनी नंतर गुजरातमधील डांग आणि कपराडा तालुक्यांतील बेकायदेशीर जंगलतोडीचा 150 कोटी रुपयांचा घोटाळा आपल्या न्यूज शोमध्ये उघड केला. त्यानंतर गुजरात सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले गेले. या घटनेने गढवी (इसुदान गढवी आप) यांना प्रसिद्धी मिळवून दिली आणि त्यांच्यावर निर्भय पत्रकाराचा शिक्का बसला. एका टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमाने त्यांची उंची वाढवली. त्यांनी ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. एका कार्यक्रमातून त्यांची लोकप्रियता संपूर्ण गुजरातमध्ये पाहायला मिळाली. या कार्यक्रमात ते मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारसमोर मांडायचे. त्यामुळे तालुका व गावपातळीवर त्यांचा प्रचार दिवसेंदिवस वाढत गेला. दुसरीकडे सरकारला अनेक प्रश्न विचारूनही तोडगा निघत नसल्याने हा गोंधळ साफ करायचा तर मला स्वत:च घाणीत उतरावे लागेल, असा विचार त्यांनी केला. त्यामुळेच त्यांनी पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश केला.

आम आदमी पक्षातील महत्त्वाचा नेता इसुदान गढवी - (isudan Gadhvi aap) गढवी यांनी राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते आम आदमी पक्षात प्रवेश केला. आम आदमी पार्टीमध्ये राष्ट्रीय सहसचिव म्हणून महत्त्वाचे स्थान त्यांना मिळाले आहे. त्यांच्यावर आणि गुजरातच्या विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. एक पत्रकार असल्याने, येशुदान यांना भाजप आणि काँग्रेसच्या अंतर्गत कामकाजाचीही चांगली कल्पना आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी इसुदान गढवी यांनी किनारी भागाचा दौरा केला आहे.

गढवी यांच्यासंदर्भातील वाद - डिसेंबर 2021 मध्ये गुजरात भाजप सरकारने सरकारी भरती पेपर लीक प्रकरणी कारवाई केली. ज्यामध्ये गोपाल इटालिया, इसुदान गढवी, मनोज सोरठिया यांच्यासह नेत्यांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये इसुदान गढवी (isudan gadhvi aap) यांच्यावर खंडणीचाही आरोप करण्यात आला.

आता गढवी आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणार आहेत. एकूण 182 सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात 1 आणि 5 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे.

Last Updated : Nov 4, 2022, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.