ETV Bharat / bharat

इस्रोच्या उच्च अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला - इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन यांनी कोरोना लसीचा डोस घेतला

इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन, वैज्ञानिक सचिव डॉ. उमामहेश्वरन, माजी अध्यक्ष डॉ. एएस किरण कुमार आणि डॉ. के राधा कृष्णन यांना बंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये कोरोनव्हायरस लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्ली येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.

इस्रोच्या उच्च अधिकाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला

author img

By

Published : Mar 7, 2021, 10:48 AM IST

बंगळुरू - एक मार्चपासून भारतात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यामध्ये साठ वर्षांवरील व्यक्तींना आणि गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. यात इस्रोचे प्रमुख डॉ. सिवन, वैज्ञानिक सचिव डॉ. उमामहेश्वरन, माजी अध्यक्ष डॉ. एएस किरण कुमार आणि डॉ. के राधा कृष्णन यांना बंगळुरूच्या एस्टर सीएमआय हॉस्पिटलमध्ये कोरोनव्हायरस लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) दिल्ली येथे कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. तसेच त्यांनी लस घेण्यास पात्र असलेल्यांना लस घेण्याचे आवाहन केले. देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारी 2021 रोजी सुरू करण्यात आली होती.

कर्नाटकच्या आरोग्य विभागाने सोमवारपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्याकरीता बंगळुरुमधील 18 खासगी आणि 5 सरकारी रुग्णालयाची यादी दिली आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार या चार दिवसांवर सरकारी रुग्णालयात लसीकरण केले जाईल, तर खासगी रुग्णालयांमधील सर्व कामकाजाच्या दिवशी दिले जाईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतात गेल्या 24 कोरोनाचे नवीन 18 हजार 327 आणि 108 मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणे 1 कोटी 11 लाख 92 हजार 88 वर पोहचली आहे. त्यात 1 लाख 80 हजार 304 सक्रिय रुग्णांचा समावेश आहे. तर मृत्यूची संख्या 1 लाख 57 हजार 656 इतकी आहे. आतापर्यंत आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत एकूण 1 कोटी 94 लाख 97 हजार 704 लोकांना लस देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.