श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) शास्त्रज्ञांनी आज सकाळी जिओस्टेशनरी सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (GSLV) द्वारे नेव्हिगेशन उपग्रह एन व्ही एस 01 प्रक्षेपित केला आहे. इस्त्रोने दुसऱ्या पिढीतील नेव्हिगेशन उपग्रह मालिका सुरू करण्याची योजना आखली आहे. ही भारताची स्वदेशी नेव्हिगेशन प्रणाली असून ती NAVIC रिअल टाईम आणि वेळेची स्थिती दर्शवणार असल्याचा दावा शास्त्रज्ञांकडून करण्यात येत आहे.
-
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO), launches its advanced navigation satellite GSLV-F12 and NVS-01 from Sriharikota.
— ANI (@ANI) May 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video: ISRO) pic.twitter.com/2ylZ8giW8U
">#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO), launches its advanced navigation satellite GSLV-F12 and NVS-01 from Sriharikota.
— ANI (@ANI) May 29, 2023
(Video: ISRO) pic.twitter.com/2ylZ8giW8U#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO), launches its advanced navigation satellite GSLV-F12 and NVS-01 from Sriharikota.
— ANI (@ANI) May 29, 2023
(Video: ISRO) pic.twitter.com/2ylZ8giW8U
या उपग्रहामुळे कळणार अचूक स्थिती : हा उपग्रह भारताच्या भूभागाभोवती सुमारे 1 हजार 500 किमी परिसरात रिअल-टाइम स्थिती आणि वेळेची सेवा प्रदान करणार आहे. इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, प्रक्षेपणासाठी रविवारी सकाळपासून 7.12 वाजतापासून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी उपग्रह प्रक्षेपित करण्याची तयारी सुरू केली होती. 2 हजार 232 किलोचा NVS-01 नेव्हिगेशन उपग्रह घेऊन जाणारा 51.7 मीटर उंच GSLV सोमवारी सकाळी 10.42 वाजता सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून त्याच्या 15 व्या उड्डाण केले आहे.
50 नॅनोसेकंदांपेक्षा अधिक वेळेची अचूकता करणार प्रदान : इस्रोने तयार केलेला एन व्ही एस 01 हा उपग्रह वेळेची अचुकता प्रदान करणार आहे. सुमारे 20 मिनिटे रॉकेट उपग्रहाला जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये 251 किमी उंचीवर नेणार आहे. नेव्हिगेटर सिग्नल वापरकर्त्याची 20 मीटरपेक्षा चांगली स्थिती आणि 50 नॅनोसेकंदांपेक्षा अधिक वेळेची अचूकता प्रदान करण्यासाठी हा उपग्रह डिझाइन करण्यात आला आहे. 51.7 मीटर उंच जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकलने 2 हजार 232 किलो नेव्हिगेशन उपग्रह NVS-01 ला सतीश धवन स्पेस सेंटरच्या (SHAR) दुसऱ्या लॉन्च पॅडवरून हे प्रक्षेपण पार पडले आहे.
इस्त्रोने वापरले स्वदेशी बनावटीचे अणू घड्याळ : या उपग्रहाच्या 20 मिनिटांच्या लिफ्ट ऑफनंतर रॉकेट उपग्रहाला 251 किमी उंचीवर जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये तैनात करणार आहे. NVS-01 नेव्हिगेशन पेलोडमध्ये L1, L5 आणि S बँड आहेत. सोमवारच्या प्रक्षेपणात प्रथमच स्वदेशी बनावटीचे रुबिडियम अणू घड्याळ वापरण्यात येणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
अॅप्लिकेशन सेंटरने विकसित केले रुबिडियम घड्याळ : वैज्ञानिकांनी पूर्वी तारीख आणि स्थान निश्चित करण्यासाठी आयात केलेल्या रुबिडियम अणू घड्याळांचा वापर केला. आता अहमदाबाद स्थित स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने विकसित केलेले रुबिडियम अणू घड्याळ जहाजावर असणार आहे. हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान असून ते काही देशांकडेच उपलब्ध आहे. NavIC च्या काही ऍप्लिकेशन्समध्ये स्थलीय, हवाई आणि सागरी नेव्हिगेशन आणि सागरी मत्स्यपालनामधील स्थान आधारित सेवा समाविष्ट आहेत.