बंगळुरु - भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे जीएसएलवी-एफ10, ईओएस-03 हे मिशन अयशस्वी झाले आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज पहाटे 5 वाजून 43 मिनिटावेळी जीएसएलवी-एफ 10च्या सहायाने ईओएस-03 हा उपग्रह प्रेक्षेपित करण्यात आला होता. मात्र काही वेळातच हे प्रक्षेपण अयशस्वी झाले. ईओएस-03 हा उपग्रह पृथ्वीवर निगराणी कराण्यासाठी पाठवण्यात येत होता. मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे याचे उड्डाण अयशस्वी झाल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी याची माहिती दिली.
इस्रोचे अध्यक्ष के. सिवन म्हणाले की क्रायोजेनिक इंजिनच्या स्तरामध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने GSLV-F10/EOS-03 मिशन अयशस्वी झाले. जीएसएलवी-एफ 10/ईओएस-03 अभियानासाठी उलट गणती बुधवारी पहाटे 3 वाजून 43 मिनिटाला सुरू झाली होती. इस्रोकडून या वर्षातील ही दुसरी मोहीम हाती घेण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात ब्राझीलचे भू-संशोधनाशी संबंधित उपग्रह अॅमॅजोनिया-1 आणि इतर अन्य 18 लहान उपग्रह अंतराळत प्रक्षेपित करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारची ही दुसरी प्रक्षेपण मोहीम हाती घेण्यात आली होती, त्यात तांत्रिक बाबींमुळे अपयश आले आहे.
ईओएस-03 चे प्रक्षेपण या वर्षी एप्रिलमध्येच होणार होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. हा सर्वेक्षण उपग्रह देश आणि देशाच्या सीमा भागातील छायाचित्रे क्षणाक्षणाला उपलब्ध करून देणारे होते. तसेच नैसर्गिक आपत्ती काळात तत्काळ त्या भागाची निगराणी करण्यासाठी उपयुक्त ठरणार होते. हा अत्याधुनिक भू-सर्वेक्षण उपग्रह ईओएस-03 को जीएसएलवी-एफ10 च्या माध्यमातून जमिनीच्या समांतर कक्षेत अंतराळात स्थापित करण्यात येणार होता.
या या प्रक्षेपण मोहिमेच्या माध्यमातून सोडण्यात येणाऱ्या उपग्रहाच्या मदतीने वास्तविक परिस्थितीत छायचित्रे उपलब्ध करून देणे, नैसर्गिक आपत्ती काळातील घटनास्थळाची पाहणी करणे, आपत्तीच्या सुचना देणे, चक्रवादळाचे निरीक्षण करणे याबाबतची माहिती मिळवणे शक्य होणार होते. हा पुढील 10 वर्ष सेवा देणार होता.