ETV Bharat / bharat

उत्तर भारतात ७ जानेवारीपासून तीव्र थंडीची लाट - हवामान विभाग

author img

By

Published : Dec 31, 2020, 7:52 PM IST

सध्या उत्तर भारतात कड्याक्याची थंडी पडली असून ७ जानेवारीपासून थंडीची आणखी तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - सध्या उत्तर भारतात कड्याक्याची थंडी पडली असून ७ जानेवारीपासून थंडीची आणखी तीव्र लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पूर्व राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणाच्या काही भागात २ ते ६ जानेवारी दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस -

दिल्लीतील सफदरजंग ऑब्जर्व्हरी येथे किमान तापमान ३.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. १२ जानेवारीनंतर 'वेस्टर्न डिस्टर्बन्सेस' म्हणजेच उत्तरेकडील वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिमालयीन भागात बर्फवृष्टी आणि पाऊस पडेल. त्यानंतर उत्तर पश्चिम दिशेकडून थंड वारे दिल्ली, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशावर पसरतील, असे दिल्ली हवामान विभागाचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. दिल्ली आणि पंजाब राज्यांवर दाट धुके पसरले असून त्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या वाऱ्यांत आणखी थंडी भरत आहे, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.