श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. 14 आणि 15 जून 2023 च्या रात्री भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठे यश मिळाले. भारतीय लष्कर आणि पोलिसांनी पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यावेळी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
जवानांनी जप्त केला मोठा शस्त्रसाठा : या कारवाईत लष्करी जवान आणि पोलिसांनी एक शस्त्र, दोन पाऊच आणि दोन बॅग जप्त केल्या आहेत. यासोबतच जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये नऊ मॅगझिन आणि ४३८ राऊंडसह एक एके-७४ रायफल, चार मॅगझिनसह दोन पिस्तूल आणि साठ राउंड, सहा हातबॉम्ब, कपडे आणि औषधे यांचा समावेश आहे. या त्वरित कारवाईने घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडला ज्यामुळे पुंछ जिल्ह्यातील शांतता बिघडण्याची शक्यता होती. लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी ही माहिती दिली आहे.
उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न : यापूर्वी 23 मे रोजी जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराने हाणून पाडला होता. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. नियंत्रण रेषेजवळ (LOC) घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी केल्याचा संदर्भ देत संरक्षण प्रवक्त्याने दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला पण सतर्क जवानांनी त्यांना घेरले, त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याची माहिती दिली.
अंमली पदार्थांची तस्करी : भारतीय लष्कराच्या जवानांनी पूंछ जिल्ह्यात 9 एप्रिल रोजी नियंत्रण रेषा (LOC) ओलांडून 17 किलो अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले. तर इतर दोघांना अटक केल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली.
हेही वाचा -