नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने गेल्या नऊ वर्षात अनेक विकासकामे केली आहेत. या विकासकामांमुळे भारताच्या रस्त्यांचे जाळे 59 टक्क्यांनी वाढले असून जगात अमेरिकेनंतर भारत दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या देशातील रस्त्यांचे जाळे 1 लाख 45 हजार 240 किमी आहे, तर 2013-14 या आर्थिक वर्षात ते केवळ 91 हजार 287 किमी होते. गेल्या नऊ वर्षांत देशातील रस्त्यांच्या जाळ्यात 59 टक्के वाढ झाल्याची माहिती नितीन गडकरी यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.
अमेरिकेनंतर भारत पोहोचला दुसऱ्या क्रमांकावर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सरकारने रस्ते निर्मितीत मोठा आयाम पूर्म केल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीवर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आज भारताचे रस्त्यांचे जाळे जगात अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. यादरम्यान भारताने रस्ते बांधणीच्या क्षेत्रात सात जागतिक विक्रमही केल्याचेही नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.
-
Interacting with Media on the 9 years achievement of MoRTH, GOI. #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva https://t.co/ueAF60e6bP
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Interacting with Media on the 9 years achievement of MoRTH, GOI. #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva https://t.co/ueAF60e6bP
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 27, 2023Interacting with Media on the 9 years achievement of MoRTH, GOI. #9YearsOfModiGovernment #9YearsOfSeva https://t.co/ueAF60e6bP
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 27, 2023
टोलच्या महसुलात वाढ : गेल्या नऊ वर्षांत टोलमधून मिळणारा महसूल 4 हजार 770 कोटी रुपयांवरून 41 हजार 342 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. 2030 पर्यंत टोल महसूल 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा मानस आहे. टोल संकलनासाठी FASTag प्रणालीचा वापर केल्यामुळे टोल प्लाझावर वाहनांचा प्रतीक्षा वेळ 47 सेकंदांपर्यंत कमी झाला आहे. ही वेळ 30 सेकंदात आणण्यासाठी सरकार आणखी काही पावले उचलत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पूर्णपणे इथेनॉलवर चालणारे वाहने आणणार : पायाभूत सुविधा, रस्ते जोडणी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या विकासाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. आम्ही नवीन वाहने आणत असून ती पूर्णपणे इथेनॉलवर चालतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यात बजाज, टीव्हीएस आणि हिरो स्कूटर 100 टक्के इथेनॉलवर चालतील. पेट्रोलशी तुलना केल्यास ते स्वस्त होईल. इथेनॉलचा दर 60 रुपये आहे, तर पेट्रोलचा दर 120 रुपये प्रति लिटर आहे. त्यातून 40 टक्के वीजनिर्मिती होईल, अशी माहितीही नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.
एनएचएआयमध्ये पैसे गुंतवण्याचा आग्रह : नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेतील पत्रकारांना आणि पगारदार कर्मचाऱ्यांना एनएचएआयमध्ये पैसे गुंतवण्याचे आवाहन केले. 'एनएचएआयने बाजारात मोठी विश्वासार्हता मिळवली आहे. नागरिक तेथे गुंतवणूक करत आहेत' यावर नितीन गडकरी यांनी प्रकाश टाकला. NHAI मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर असून बँका तुम्हाला 5.5 टक्के व्याज देतात पण NHAI दरमहा 8.05 टक्के व्याज देत आहे. NHAI ने बाजारात खूप मान मिळवला आहे. त्यामुळे एनएचएआयमध्ये गुंतवणूक करण्याची त्यांनी यावेळी विनंती केली.
भ्रष्टाचाराचा मुद्दा नाहीसा झाला : पायाभूत सुविधांच्या चांगल्या विकासासाठी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी, कंत्राटदार, मजूर आणि इतर अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. सर्व काही डिजिटल आणि पारदर्शक झाल्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा नाहीसा झाल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा -
- Nitin Gadkari in Bhandara: काँग्रेसने मागील 60 वर्षात केलेल्या कामाच्या दुप्पट कामे आम्ही 9 वर्षात केली- नितीन गडकरी
- Nitin Gadkari News: गरीब लोक कर्जाचे हफ्ते नियमितपणे भरतात; मात्र, कर्ज बुडव्यांमध्ये श्रीमंत लोकांचे प्रमाण सर्वाधिक- नितीन गडकरी
- Nitin Gadkari : भारतातील रस्ते जनतेची संपत्ती, आम्ही सर्व जनतेचे सेवक - नितीन गडकरी