ETV Bharat / bharat

Indin Railways: भारतीय रेल्वेची प्रवाशांना अनोखी भेट, तिकीट नसतानाही करू शकतो प्रवास - Indian Railways Unique gift

Indin Railways: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असते. ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी काही नियमावली लावली जाते. कधी रेल्वे प्रवासात अनेक सवलती दिल्या जातात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी सर्व सुविधा पुरविल्या जातात. अनेकदा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधा आणि रेल्वेशी संबंधित नियमांची माहिती असायला हवी. या नियमांची माहिती नसल्यास अनेक वेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या अशा सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या अंतर्गत तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये चढू शकता.

Indian Railways Unique gift
भारतीय रेल्वेची प्रवाशांना अनोखी भेट
author img

By

Published : Oct 6, 2022, 3:54 PM IST

नवी दिल्ली : Indin Railways: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवास करणाऱयांची संख्या अधिक असते. ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांसाठी काही नियमावली लावली जाते. कधी रेल्वे प्रवासात अनेक सवलती दिल्या जातात. भारतीय रेल्वेकडून प्रवाशांसाठी सर्व सुविधा पुरविल्या जातात. अनेकदा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सुविधा आणि रेल्वेशी संबंधित नियमांची माहिती असायला हवी. या नियमांची माहिती नसल्यास अनेक वेळा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला रेल्वेच्या अशा सुविधेबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या अंतर्गत तुम्ही विना तिकीट ट्रेनमध्ये ( Travel without ticket ) चढू शकता.

कार्डद्वारे करा पेमेंट : रेल्वेच्या नवीन नियमावलीनुसार, जर तुमच्याकडे प्लॅटफॉर्म तिकीट असेल आणि तुमच्याकडे प्रवासाचे तिकीट नसेल, तर तुम्ही डेबिट कार्डद्वारे ट्रेनमध्ये भाडे किंवा दंड भरू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे ट्रेनचे तिकीट नसेल, तर ट्रेनमध्ये चढल्यानंतर तुम्ही कार्डद्वारे पैसे देऊन बनवलेले तिकीट देखील मिळवू शकता. अनेकवेळा प्रवाशांना कन्फर्म तिकीट न मिळाल्यास मनस्ताप सहन करावा लागतो. यातच भर म्हणून रेल्वेकडून मोठा दंड देखील ठोठावला जातो. आता मात्र तुम्ही हा दंड तुम्ही कार्डद्वारे भरू शकता.

प्रवासादरम्यान पेंमेट शक्य : रेल्वे अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणांना 4 जी सोबत जोडत आहे. रेल्वे बोर्डाच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांकडे असलेल्या पॉइंट ऑफ सेलिंग (पीओएस) मशीनमध्ये सध्या 2 जी सिम आहेत, त्यामुळे दुर्गम भागात नेटवर्कची समस्या कायम आहे. मात्र 4जी शी कनेक्ट केल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही. यानंतर तुम्ही प्रवासादरम्यान सहज पेमेंट करू शकाल.

प्रवासात काढा तिकीट : जर तुमच्याकडे रेल्वे प्रवासात तुमचे आसन आरक्षित नसेल तर नियमांनुसार तुम्ही ट्रेनमध्ये चढण्यासाठी फक्त प्लॅटफॉर्म टिकीट घेऊ शकता. यामुळे तुम्ही कोणत्या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत आहात याचा तुमच्याकडे पुरावा असेल. मात्र ट्रेनमध्ये चढल्यानंतर तुम्ही रेल्वेच्या टिकीट निरीक्षकाशी संपर्क साधणे आवश्यक आहे. ते तुम्हाला तुमच्या प्रवासाची तिकीटे काढून देतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.