ETV Bharat / bharat

Baby Berth in Railway- पाच वर्षांहून कमी वयाची बालके असणाऱ्या मातांकरिता रेल्वेमध्ये खास 'बेबी बर्थ' - indian railways introduce baby berth

सध्या काही रेल्वेमध्ये ते प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ रेल्वेमध्ये दोन मुलांच्या सीटची व्यवस्था ( Baby Berth in Lucknow Mail )  करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे कोणतेही अतिरिक्त भाडे आकारणार नाही. रेल्वेने ट्विट करून ही माहिती ( Indian railway tweet on baby Berth ) दिली आहे.

रेल्वेमध्ये खास बेबी बर्थ
रेल्वेमध्ये खास बेबी बर्थ
author img

By

Published : May 10, 2022, 3:15 PM IST

Updated : May 10, 2022, 7:47 PM IST

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने महिलांसाठी राखीव असलेल्या खालच्या बर्थसह 'बेबी बर्थ'ची ( baby Berth) म्हणे माता-बालकांसाठी खास आसन व्यवस्था केली आहे. जेणेकरून लहान मुले कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्या आईसोबत झोपू शकतील. वास्तविक, रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान महिलांना होणारा त्रास लक्षात घेता सीटसोबतच माता-बालकासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. महिलेसाठी राखीव असलेल्या खालच्या सीटसह मुलांच्या सीटची व्यवस्था करण्यात आली आहे.

सध्या काही रेल्वेमध्ये ते प्रायोगिक तत्त्वावर बसवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊ रेल्वेमध्ये दोन मुलांच्या सीटची व्यवस्था ( Baby Berth in Lucknow Mail ) करण्यात आली आहे. यासाठी रेल्वे कोणतेही अतिरिक्त भाडे आकारणार नाही. रेल्वेने ट्विट करून ही माहिती ( Indian railway tweet on baby Berth ) दिली आहे.

लवकरच इतर रेल्वेमध्येही बेबी बर्थ- ट्विट करून ही माहिती शेअर करत रेल्वेने सांगितले की, या सुविधेनंत गर्भवती व पाच वर्षांहून कमी वयाची बालके असणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वेने ट्विट करून मुलांच्या सीटा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये लखनऊ रेल्वेच्या एसी 3 मध्ये दोन मुलांकरिता सीट बनविण्यात आल्याचे म्हटले आहे. मातृदिनानिमित्त ही व्यवस्था करण्यात आली आहे. लवकरच इतर रेल्वेमध्येही मुलांसाठी सीट वाढवता येईल.

मुलांच्या बर्थसाठी अतिरिक्त भाडे नाही- एकट्या प्रवास करणाऱ्या महिला, गरोदर आणि पाच वर्षांखालील मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना लोअर बर्थ देण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जातात. महिला प्रवाशांना रात्री झोप येत नाही. त्यामुळे महिलांसाठी राखीव असलेल्या खालच्या बर्थसह मुलाच्या बर्थची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच मूल बर्थवरून पडणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुलांच्या बर्थसाठी रेल्वे कोणतेही अतिरिक्त भाडे आकारणार नाही. यासाठी आरक्षण तिकीट काढताना पाच वर्षांखालील मुलांचे नाव भरावे लागेल. त्यांना बेबी बर्थ मिळेल.

रेल्वे प्रवासादरम्यान एकाच बर्थवर आई व लहान बाळाला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी नंदुरबार येथील एका दाम्पत्याने आपल्या लहान बालकाला घेऊन प्रवास कताना आईला मोठ्या प्रमाणावर अडचणी आल्या. त्यावर देवरे दाम्पत्याने संशोधन करत "बेबीबर्थ"ची संकल्पना निर्माण केली. कोरोना काळात दाम्पत्याने घरात बसूनच बेबीबर्थ स्ट्रक्चर तयार केले व त्यावर सर्व बाबींचा विचारपूर्वक अभ्यास करून दाम्पत्याने बेबीबर्थ तयार केले आहे. याबाबत ईटीव्ही भारतने स्पेशल वार्तांकन केले होते.

अशी सुचली संकल्पना- दोन वर्षांपूर्वी एका प्रदर्शनासाठी नितीन देवरे हे परिवारासोबत एका ठिकाणी गेले होते. त्यांचे लहान बाळ असल्याने त्यांना रेल्वे प्रवासादरम्यान बाळाला झोपवण्यासाठी आलेल्या अडचणीनंतर टाळेबंदीदरम्यान त्यांनी रेल्वे प्रवास करताना बाळाला झोपवण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण बेबी बर्थचे संशोधन सुरू केले होते. त्यात देवरे दाम्पत्यांना यश आले असून बेबीबर्थच्या निर्मितीनंतर भारतीय रेल्वेलाही त्यांनी सादरीकरण केले आहे. जवळपास पाचशे ते एक हजार रुपये दरम्यान खर्च असलेल्या बेबी बर्थच्या संशोधनावर स्वतःचे नाव कोरले जावे यासाठी शिक्षक नितीन देवरे व त्यांच्या पत्नी हर्षाली देवरे यांनी यासंबंधीचे संशोधन करीत पेटंट मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. (देवरेज फोल्डेबल बेबी बर्थ) या नावाने नुकतेच इंडियन पेटंट जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

हेही वाचा-Haryana : हडप्पा काळातील 50 सांगाडे सापडले! 7 हजार वर्षे जुन्या शहराचे रहस्य

हेही वाचा-Ashish Shelar On Thackeray Govt : आघाडी सरकार हे ‘ठग्ज् ॲाफ महाराष्ट्र’ - आशिष शेलार

हेही वाचा-Athawale On Rana Couple : राणा दाम्पत्यावर दलित असल्यामुळे अन्याय - केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा

Last Updated : May 10, 2022, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.