ETV Bharat / bharat

भारतीय वंशाच्या पत्रकाराला पुलित्झर पुरस्कार; चीनचा केला होता पर्दाफाश - पुलित्झर पुरस्कार

भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजागोपालन यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकतेली जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडिओ काढणाऱ्या डार्नेला फ्रेझियरलाही हा पुरस्कार मिळाला आहे. डार्नेला फ्रेझियर या मुलीने जॉर्ज फ्लॉएडची हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद केली होती.

मेघा राजगोपालन
मेघा राजगोपालन
author img

By

Published : Jun 12, 2021, 10:42 PM IST

Updated : Jun 12, 2021, 10:56 PM IST

न्यूयार्क - कोलंबिया विद्यापीठाने यावर्षीच्या पुलित्झर पारितोषिकांची घोषणा केली आहे. भारतीय वंशाच्या पत्रकार मेघा राजागोपालन यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेघा राजगोपालन, ऐलिसन किलिंग, क्रिस्टो बुशेक या तीघांना आंतरराष्ट्रीय रिपोर्टिंगमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मेघा राजागोपालन यांनी चीनचा खरा चेहरा जगासमोर उघड केला होता. चीनने आपल्या शिनजियांग प्रांतातील शिबिरांमध्ये लाखो उईगर मुस्लिमांना कैद करून ठेवल्याचे वृत्ताकंन राजगोपालन यांनी केले होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात देण्यात येणारा हा अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे.

  • Am so grateful to our team, to @BuzzFeedNews, @alexcampbell & the organizations that supported us.

    Most of all I'm grateful to ex-detainees who told us what happened to them inside Xinjiang's camps. The public owes much to their courage.

    Still much more work to be done. https://t.co/IEylM09S5r

    — Megha Rajagopalan (@meghara) June 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

2017 मध्ये, चीनने शिनजियांग प्रांतात कोट्यवधी मुस्लिमांना ताब्यात घेतले. तेव्हा आंतरराष्ट्रीय शिबिराला भेट देणाऱ्या राजगोपालन पहिल्या पत्रकार होत्या. मुस्लिमांना ताब्यात ठेवल्याचे चीनने नाकारले होते. यानंतर चीनने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. व्हिसा रद्द करत मेघा यांना चीनने हद्दपार केले होते.

नील बेदी यांनाही पुरस्कार -

बजफीड न्यूज या इंटरनेट मीडियाच्या दोन पत्रकारांना पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. टेंपा बे टाईम्समध्ये कॅथलीन मैकग्रॉरी आणि नील बेदी यांना शोध पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी मुलांच्या तस्करीविषयी शोध वृत्तांकन केले होते.

जार्ज फ्लॉइडची हत्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या मुलीला पुरस्कार

अमेरिकतेली जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा व्हिडिओ काढणाऱ्या डार्नेला फ्रेझियरलाही हा पुरस्कार मिळाला आहे. डार्नेला फ्रेझियर या मुलीने जॉर्ज फ्लॉएडची हत्येची घटना कॅमेऱ्यात कैद केली होती. त्यानंतर अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधात मोठे आंदोलन उभे राहिले होते. तसेच मिनीआपोलिस पोलिसांनी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल केलेली चौकशी आणि आंदोलनाच्या कव्हरेजबद्दल ब्रेकिंग न्यूज रिपोर्टिंग प्रकारात द स्टार ट्रिब्यूनच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

पुलित्झर पुरस्काराविषयी...

पुलित्झर हा पुरस्कार पत्रकारितेतील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. अमेरिकेतील हा एक मोठा पुरस्कार आहे. १९१७मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांचे हे १९१७वे वर्ष आहे. पुलित्झर पुरस्कार विजेत्यांना प्रमाणपत्रासर १५ हजार डॉलर्सचे बक्षीसही देण्यात येते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार वगळता इतरांनाच रोख रक्कम पुरस्कारात मिळते. सार्वजनिक सेवा विभागातील पुरस्कार विजेत्याला सुवर्णपदक देण्यात येते.

Last Updated : Jun 12, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.