जयपूर Indian Air Force : राजधानी जयपूरमधील जलमहाल येथे भारतीय हवाई दलाकडून एअर शोचं आयोजन करण्यात आलं आहे. हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनं आकाशात अप्रतिम स्टंट केले. 14 सदस्यीय वैमानिकांच्या चमूनं जयपूर विमानतळावरून उड्डाण केलं. हवाई सेवेच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या सदस्यांनी जयपूरच्या लोकांकडून मिळालेल्या प्रेम, आदराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
तरुणांना जागरूक करणं : सूर्यकिरण एरोबॅटिक टीमच्या सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांचे अनुभव सांगितले. टीम लीडर जीएस ढिल्लन म्हणाले की, एअर शोचा मुख्य उद्देश तरुणांना जागरूक करणे हा आहे, जेणेकरून देशातील अधिकाधिक तरुण वायुसेनेत सामील व्हावे. जेव्हा लढाऊ विमान धावपट्टीवरून चालवलं जातं, तेव्हा ते 6 ते 7000 फूट उंचीवर नेलं जातं. जलमहालाच्या सभोवतालच्या पर्वतांमुळं लढाऊ विमान जमिनीपासून 1000 फूट उंचीवर ठेवण्यात आलं आहे, असं त्यांनी म्हटलंय.
लोकांचे प्रेम पाहून खूप छान वाटलं : तब्बल 15 वर्षांनंतर जयपूरमध्ये एअर शो करण्याची संधी आम्हाला मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. सर्व वैमानिकांनी फायटर प्लेनचं एरोबॅटिक्स उत्तम प्रकारे काम केलं. 9 एअर एरोबॅटिक्स करणारी आमची एकमेव टीम आहे. जगात फक्त चार संघ आहेत, जे 9 एअर एरोबॅटिक्स करतात. विमान उडत असताना आपण खाली पाहू शकतो. आम्ही खाली पाहणाऱ्या लोकांची झलक पाहतो. जयपूरच्या लोकांचे प्रेम पाहून खूप छान वाटलं असं देखील ते म्हणाले.
सूर्य किरण असं नाव का ठेवलं : हा शो तरुणांना प्रेरित करण्यासाठी बनवण्यात आला आहे. तरुणांनीही संरक्षणात सहभागी व्हायला हवं. आम्ही एकत्र येतो, मग सूर्यकिरणांसारखे पसरतो. त्यामुळं संघाचं नाव सूर्यकिरण एरोबॅटिक असं ठेवण्यात आलं. अशा युक्त्या खूप सरावानंतर शिकल्या जातात. पायलट पूर्णपणं तयार होण्यासाठी सुमारे 6 ते 8 महिने लागतात. 6 ते 8 महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर पोस्टिंग होते.
एरोबॅटिक स्टंट करणं आव्हानात्मक : सूर्यकिरण एरोबॅटिक टीमचं सदस्य अंकित वशिष्ठ म्हणाले की, विमान उडवण्याचा अनुभव खूप चांगला होता. एअर शो पाहण्यासाठी लोक मोठ्या उत्साहात पोहोचले. आम्हालाही जयपूरमध्ये काहीतरी खास करण्याचा उत्साह होता. एअर शोच्या माध्यमातून तरुणांनाही प्रेरित केले जाईल. तरुणांनी ज्या प्रकारे त्यांच्या शहरावरून विमानं उडताना पाहिली, त्यांनाही त्याचा भाग व्हायला आवडेल. आकाशात असे एरोबॅटिक स्टंट करणे खूप आव्हानात्मक आहे. बर्याच वर्षांच्या सरावानंतर आपण इतक्या सहजतेनं आकाशात युक्त्या करू शकतो. युवकांना संदेश देताना ते म्हणाले की, त्यांनी नेहमी मेहनत करत रहावी. तुम्हाला संरक्षणात जाण्याची संधी मिळाली, तर तुम्ही तुमच्या देशाचं रक्षण करू शकता. इतर लोकांना देखील प्रेरित करू शकता.
तुमच्यात देशभक्ती पाहिजे : महिला पायलट कंवल संधू म्हणाल्या की, आकाशात विमान उडवणं खूप संस्मरणीय होतं. संघानं रात्रंदिवस मेहनत घेतली आहे. ६ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही टीम आता ६ महिने भारताच्या प्रत्येक भागात आपले एरोबॅटिक्स दाखवणार आहे. देशातील तरुणांना प्रेरणा देणे हा आमचा उद्देश आहे. भारतीय हवाई सेवा, इतर संरक्षण अभ्यासक्रमांमध्ये सामील होण्याच त्यांनी तरुणांना अव्हान केलंय. महिलांना संदेश देताना त्या म्हणाल्या की, तुम्ही तुमचा गणवेश एकदा घातला की तुम्ही स्त्री आहात, की पुरुष यात फरक पडत नाही.
तरुणांना प्रेरित केलं : सूर्य किरण एरोबॅटिक टीमचे सदस्य परितोष नेगी म्हणाले, की विमान उडवणे हा खूप चांगला अनुभव होता. लोकांचा उत्साह पाहून आम्हालाही प्रेरणा मिळाली आहे. आम्ही लोकांना चांगलं प्रेरित केलंय. टीमचे सदस्य अर्जुन के पटेल म्हणाले की, मी नुकताच सूर्यकिरणमध्ये माझा प्रवास सुरू केला आहे. जयपूरमधला पहिलाच अनुभव खूप चांगला होता.
3 दिवसांचा एअर शो : 15 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर असे तीन दिवस दररोज दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत एअर शो आयोजित करण्यात आला आहे. एअर शोच्या माध्यमातून तरुणांना सेवेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलंय. जलमहालच्या पालावर हजारो लोक एअर शो पाहण्यासाठी आले होते. आकाशात हवाई दलाच्या विमानांचा अद्भुत पराक्रम पाहून लोकांनी भारत मातेचा जयघोष सुरू केला. लोकांच्या प्रचंड गर्दीमुळे वाहतूक एका बाजूने वळवण्यात आली होती. एअर शोमध्ये एनसीसी कॅडेट्स देखील होते. एअर शोच्या माध्यमातून तरुणांमध्ये भारतीय हवाई दलाविषयी जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हेही वाचा -
- IND vs SL Asia Cup 2023 Final : आशिया चषकाच्या इतिहासात मोहम्मद सिराजनं रचला नवा इतिहास, जाणून घ्या कामगिरी
- IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव
- IND vs SL Asia Cup २०२३ : फायनल मॅचवर पावसाचं सावट, राखीव दिवशीही पाऊस आला तर काय?