हरारे: भारत आणि झिम्बाब्वे ( IND vs ZIM 2nd Odi ) संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना हरारे येथील क्रिकेट स्टेडिमयवर खेळला गेला. या सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 5 विकेट्सने धूळ चारत सलग दुसरा विजय ( India beat Zimbabwe by 5 wickets ) नोंदवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने भारतीय संघाला विजयासाठी 162 धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारतीय संघाने 25.4 षटकांत 5 गडी गमावत 167 धावा करत पूर्ण केले. तसेच भारतीय संघाने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे.
-
That's that from the 2nd ODI.#TeamIndia win by 5 wickets and take an unassailable 2-0 lead in the series.
— BCCI (@BCCI) August 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/RDdvga1BXI #ZIMvIND pic.twitter.com/AeG4OsDPQO
">That's that from the 2nd ODI.#TeamIndia win by 5 wickets and take an unassailable 2-0 lead in the series.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
Scorecard - https://t.co/RDdvga1BXI #ZIMvIND pic.twitter.com/AeG4OsDPQOThat's that from the 2nd ODI.#TeamIndia win by 5 wickets and take an unassailable 2-0 lead in the series.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
Scorecard - https://t.co/RDdvga1BXI #ZIMvIND pic.twitter.com/AeG4OsDPQO
शार्दुल ठाकूरची भेदक गोलंदाजी -
-
Shardul Thakur scalped 3⃣ wickets and was #TeamIndia's Top Performer from the first innings.
— BCCI (@BCCI) August 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at the summary of his performance 💪#ZIMvIND pic.twitter.com/eI0N1MxiuH
">Shardul Thakur scalped 3⃣ wickets and was #TeamIndia's Top Performer from the first innings.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
A look at the summary of his performance 💪#ZIMvIND pic.twitter.com/eI0N1MxiuHShardul Thakur scalped 3⃣ wickets and was #TeamIndia's Top Performer from the first innings.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
A look at the summary of his performance 💪#ZIMvIND pic.twitter.com/eI0N1MxiuH
या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेची सुरुवात निराशाजनक झाली. 31 धावांपर्यंत संघाने 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, शॉन विल्यम्सने 42 धावांची खेळी करत संघाचा डाव काही काळ सांभाळला. पण झिम्बाब्वेचा संघ 38.1 षटकांत 161 धावांत गारद झाला. रायन बर्ले 39 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या ( Shardul Thakur took most 3 wickets ). त्याचबरोबर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतले.
संजू सॅमसनची शानदार फटकेबाजी -
-
Sanju Samson is adjudged Player of the Match for his match winning knock of 43* as India win by 5 wickets.
— BCCI (@BCCI) August 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/Bv8znhTJSM
">Sanju Samson is adjudged Player of the Match for his match winning knock of 43* as India win by 5 wickets.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
Scorecard - https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/Bv8znhTJSMSanju Samson is adjudged Player of the Match for his match winning knock of 43* as India win by 5 wickets.
— BCCI (@BCCI) August 20, 2022
Scorecard - https://t.co/6G5iy3rRFu #ZIMvIND pic.twitter.com/Bv8znhTJSM
162 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला कर्णधार केएल राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. तो फक्त एकच धाव काढू शकला. त्यानंतर शुबमन गिल आणि शिखर धवनने दुसऱ्या विकेट्ससाठी 42 धावांची भागीदारी केली. त्यानंतर दोन्ही फलंदाज प्रत्येकी 33 धावांवर बाद झाले. युवा फलंदाज इशान किशन देखील अवघ्या 6 धावांवर बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाने आपले शतक पूर्ण करण्या अगोदर 4 विकेट्स गमावल्या होत्या. दरम्यान दीपक हुड्डाने 25 धावांची खेळी करत भारताची पडझड रोखली. त्यानंतर संजू सॅमसने ( Batsman Sanju Samson ) 39 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा करत, भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना ल्यूक जोंगवेने ( Bowler Luke Jongwe ) सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
हेही वाचा - Fast Bowler Jhulan Goswami झुलन गोस्वामी तिचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना या ऐतिहासिक मैदानावर खेळणार