ETV Bharat / bharat

गेल्या 24 तासांत 45,892 नव्या रुग्णांची नोंद; रिकव्हरी रेट 97.18 वर - आजची कोरोना रुग्णांची संख्या

देशात एकूण कोरोना रुग्णांची सख्या 3,07,09,557 झाली आहे. तर 4,05,028 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 2,98,43,825 जण कोरोनामुक्त झाले आहते. तर 4,60,704 जणांवर देशातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासांत 33,81,671 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 36,48,47,549 जणांचे लसीकरण झाले आहे.

Covid
कोरोना
author img

By

Published : Jul 8, 2021, 12:35 PM IST

नवी दिल्ली - आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या 3 कोटीपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 24 तासांत 45,892 नव्या रुग्णांची आणि 817 मृत्यूची नोंद झाली आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे 44,291 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशातील रुग्णांचा रिकव्हरी रेट 97.18 वर पोहचला आहे. तर मृत्यूचा दर 1.32 आहे.

देशात एकूण कोरोना रुग्णांची सख्या 3,07,09,557 झाली आहे. तर 4,05,028 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 2,98,43,825 जण कोरोनामुक्त झाले आहते. तर 4,60,704 जणांवर देशातील विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर गेल्या 24 तासांत 33,81,671 जणांना लस टोचवण्यात आली आहे. तर आतापर्यंत 36,48,47,549 जणांचे लसीकरण झाले आहे.

महाराष्ट्रात सर्वांत जास्त मृत्यू -

आतापर्यंत सर्वांत जास्त 1,23,857 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील मृत्यू दर जास्त आहे. तर सध्या महाराष्ट्रात 117869 जणांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत 8899 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 58,81,167 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री -

नरेंद्र मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील पहिलाच मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष उलटल्यानंतर आता मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्ताराआधी सरकारमधील 12 मंत्र्यांनी राजीनामे दिले. यात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून आता मनसुख मांडवीय देशाचे नवे आरोग्यमंत्री असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.