नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. भारतातील दररोजच्या कोरोना रुग्णांच्या ( India Corona New Patient ) नोंदीत कधी घट तर कधी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 14 हजार 148 कोरोना रुग्ण आढळले असून 302 जणांचा मृत्यू ( India Corona death ) झाला आहे. तर यात दिलासादायक बाब म्हणजे 30 हजार 9 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहिती प्रमाणे देशात सध्या 1 लाख 48 हजार 359 सक्रिय रुग्ण आहेत. भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 0.35 टक्के नोंदवला गेला आहे. तर आतापर्यंत 4 कोटी 22 लाख 19 हजार 896 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 5 लाख 12 हजार 924 लोकांचा बळी गेला आहे.
मागील अडीच वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. भारतात काही दिवसांपासून नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमधे मोठी घट नोंदवली जात होती. कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी देशव्यापी सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत,देशात आतापर्यंत 1,76,52,31,385 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा - BJP Agitation Malik Resignation : नवाब मलिकांच्या अटकेसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन