नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले असून भारतामध्येही ( Coronavirus cases in India ) कोरोनाचा प्रसार वाढत चालला आहे. गेल्या 24 तासामध्ये 2,85,914 रुग्णांची नोंद झाली असून 665 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2,99,073 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 22,23,018 वर पोहचली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
राज्यनिहाय आकेडवारी पाहता, केरळमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी केरळमध्ये 55,475 नव्या रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत केरळात एकूण 57,25,086 कोरोनाबाधित आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 3 कोटी 73 लाख 70 हजार 971 रुग्ण कोरोनामुक्त झाल आहेत. तर, 4 लाख 91 हजार 127 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंत देशात 1,63,58,44,536 जणांचे लसीकरण ( Covid vaccine in India ) झाले आहे.
कधी संपते कोरोना साखळी -
एका कोरोनाग्रस्तापासून दुसऱ्या व्यक्तीला लागण होण्याची साखळी तोडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. एखाद्या भागात 28 दिवसांत एकही नवी कोरोनाची केस आढळली नाही, आणि शेवटी आढळलेल्या रुग्णाची चाचणी निगेटिव्ह आली तर, रुग्णांची साखळी तुटली असे समजण्यात येते.
हेही वाचा - Bhagat Singh Koshyari Unfurls National Flag : राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्कवर ध्वजारोहण
हेही वाचा - Breaking News Live Updates : देशात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा