ETV Bharat / bharat

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट महिन्यातच; तर ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या उच्चांक गाठणार - देशातील कोरोना रुग्णांची आकडेवारी

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात शिथिल करण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरपर्यंत येईल आणि ऑक्टोंबर महिन्यात लाट शिखरावर असेल, असे एका अहवालात म्हटलं आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Aug 2, 2021, 11:02 AM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून दुसऱ्या लाटेमुळे देशात भंयकर परिस्थिती निर्माण झाली होती. स्मशानभूमीत विदारक असे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना यातच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. देशात शिथिल करण्यात आलेल्या निर्बंधांचा परिणाम म्हणून कोरोना संसर्गाची तिसरी लाट ऑगस्ट अखेरपर्यंत येईल आणि ऑक्टोंबर महिन्यात लाट शिखरावर असेल, असे एका अहवालात म्हटलं आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दरदिवशी लाखाने रुग्णांची नोंद होऊ शकते, असे तज्ञांनी सांगितले. कोरोनाच्या दुसऱया लाटेत परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. जर तिसरी लाटही अशीच भंयकर असली, तर देशासमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीतील मथुकुममल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वामधील संशोधनाचा हवाला देत, ब्लूमबर्गने सांगितले, की सध्याची वाढती कोरोना रुग्णांची संख्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला पुढे नेईल. तर ऑक्टोंबरमध्ये लाट शिखरावर असेल. केरळ आणि महाराष्ट्रात ज्याप्रकारे कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. त्यावरून लक्षात येते, की परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. तिसऱ्या लाटेचा या दोन राज्यांना सर्वांत जास्त धोका आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल, असंही सांगितलं जात आहे. यापूर्वी विद्यासागर यांनी भारतामधील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक पहायला मिळेल असं म्हटलं होतं. मात्र, विद्यासागर यांचा अंदाज चुकला होता. तसेच कोरोना विषाणूचा डेल्टा वेरिएंट चिकनपॉक्सप्रमाणे (कांजण्या) पसरू शकतो. तसेच हा कोरोना लस घेतलेल्यांनाही होऊ शकतो.

भारतात गेल्या 24 तासांत 40,134 जणांना कोरोना व्हायरसची लागण झालेली आहे. तर 422 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

देशातील कोरोना रुग्णांची स्थिती

  • एकूण रुग्ण : 3,16,95,958
  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,08,57,467
  • एकूण मृत्यू : 4,24,773
  • सक्रिय रुग्ण संख्या : 4,13,718
  • एकूण लसीकरण: 47,22,23,639 (17,06,598 गेल्या 24 तासांत )

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.