ETV Bharat / bharat

सीमावादावर चर्चा करण्यासाठी भारत-चीन लष्करात चर्चेची दहावी फेरी - भारत चीन गलवान वाद

लडाख सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर भारत आणि चीनमध्ये लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील १० वी बैठक आज (शनिवार) होणार आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. मात्र, तरीही इतर अनेक मुद्दे वादाचे राहीले आहेत.

FILE PIC
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Feb 20, 2021, 7:05 AM IST

नवी दिल्ली - लडाख सीमेवरून सैन्य मागे घेतल्यानंतर भारत आणि चीनमध्ये लष्कराच्या कॉर्प्स कमांडर स्तरावरील १० वी बैठक आज (शनिवार) होणार आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर सीमेवरून भारत आणि चीनचे सैन्य पूर्णपणे मागे हटले आहे. मात्र, तरीही इतर अनेक मुद्दे वादाचे राहीले आहेत. त्यावरच चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. चिनी बाजूने असलेल्या मोल्डो येथे ही बैठक होणार आहे.

इतर वादग्रस्त ठिकाणांवर निघणार तोडगा?

पँगॉग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर इतर वादग्रस्त ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. लष्करी, राजनैतिक आणि राजकीय स्तरावरील अनेक बैठका आणि चर्चेनंतर गलवान खोऱ्यातील वाद मिटला. यापुढील भारताची रणनिती काय असेल याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत स्पष्टपणे सांगितल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले.

भारताची एक इंचही जमीन देणार नाही - राजनाथ सिंह

मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल २०२० नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर ८ (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत बोलताना सांगितले होते.

दरम्यान, गतवर्षी गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारतीय सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत आपले पाच सैन्य अधिकारी आणि जवान मारले गेल्याची कबुली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दिली आहे. चीनने प्रथमच गलवान खोऱ्यातील तणावात आपले सैनिक ठार झाल्याची कबुली दिली आहे. गेल्यावर्षीच्या जूनमध्ये गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. यात काराकोरममध्ये तैनात असलेले पाच अधिकारी आणि जवान ठार झाल्याचे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने सांगितल्याचे वृत्त चीनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्रात शुक्रवारी प्रकाशित झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.