नवी दिल्ली India Canada Diplomat : खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत सहभागी असल्याच्या आरोपांवरून सोमवारी कॅनडानं भारताच्या राजदूताची हकालपट्टी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून आता भारतानं कॅनडाच्या राजदूताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारनं कॅनडाच्या भारतातील राजदूताला बोलावून पाच दिवसांत भारत सोडण्यास सांगितलं.
भारतानं कॅनडाचे आरोप फेटाळले : जून २०२३ मध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी केला आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी एक निवेदन जारी करत, हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमध्ये भारतीय राजदूताचा हात असल्याचे पुरेसे पुरावे असल्याचं म्हटलं. त्यानंतर कॅनडानं एका उच्च भारतीय राजदूताची हकालपट्टी केली. मात्र, भारत सरकारनं कॅनडाचा हा आरोप साफ फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन जारी करून, कॅनडातील कोणत्याही हिंसाचारात भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.
जून २०२३ मध्ये खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरची हत्या : खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरला भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी फरारी आणि दहशतवादी घोषित केलं होते. याशिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणेनं त्याच्यावर १० लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होते. जून २०२३ मध्ये, कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबियातील सरे येथे निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मंदिराच्या पार्किंगमध्ये निज्जरला ट्रकमध्ये गोळी झाडण्यात आली. कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक तपासानुसार, निज्जर याच्यावर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. घटनास्थळाजवळ तिसरा व्यक्ती कार घेऊन उभा होता. गुन्हा केल्यानंतर हल्लेखोरांनी या वाहनातून पळ काढला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा :