ETV Bharat / bharat

Womens Asia Cup 2022, INDW vs SLW : भारताची श्रीलंकेविरुद्ध 41 धावांनी विजयी सलामी, जेमिमा रॉड्रिग्जचे दमदार अर्धशतक - womens Asia Cup opener

महिला आशिया चषक 2022 ( Womens Asia Cup 2022 ) स्पर्धेतील दुसरा सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने जेमिमा रॉड्रिग्जचे दमदार अर्धशतकाच्या जोरावर श्रींलकेला 41 धावांनी पराभूत केले.

Jemima Rodriguezs
जेमिमा रॉड्रिग्ज
author img

By

Published : Oct 1, 2022, 5:31 PM IST

सिल्हेट: महिला आशिया चषक 2022 ( Womens Asia Cup 2022 ) क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघात ( INDW vs SLW ) पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रींलकेचा 41 धावांनी पराभव ( India beat Sri Lanka by 41 runs ) करत विजयी सलामी दिली. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंजदाजी करताना, 6 बाद 150 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव 18.2 षटकांत 109 धावांर आटोपला. जेमिमा रॉड्रिग्जने 76 धावांचे ( Jemima Rodriguezs half century ) महत्वपूर्ण योगदान दिले.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे निमंत्रण दिले होते. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ( Smriti Mandhana ) या दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्या. त्यामुळे भारतीय संघाचा डाव सुरूवातीलाच अडखळला. वर्मा आणि मंधाना दोघींनी अनुक्रमे 10 आणि 6 धावा केल्या. त्यानंतर पुनरागमन करत असलेली जेमिमा व कर्णधार हरमनप्रीत कौर ( Captain Harmanpreet Kaur ) या जोडीने 71 चेंडूत 92 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. हरमनप्रीत कौर 30 चेंडूत 33 धावा करत बाद झाली. तसेच जेमिमाने 53 चेंडूत 76 धावा केल्या. तळाच्या फलंदाजांनी थोडेफार योगदान दिल्याने भारतीय संघाने 7 बाद 109 अशी मजल मारली.

श्रीलंका संघाने 151 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावांचा वेग राखला होता, मात्र त्यांना आपले विकेट्स टिकवता आल्या नाहीत. नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने त्यांचा संघ संकटात सापडला. हसिनी परेरा (30), हर्षिता मडवी (26) आणि ओशाडी रणसिंघे (11) यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. परिणामी त्यांचा संघ केवळ 109 धावांवर सर्वबाद झाला. भारतासाठी डी हेमलताने ( D Hemelata ) सर्वाधिक तीन, पूजा वस्त्रकार व दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आता भारताचा पुढील सामना 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मलेशियाविरूद्ध दोन हात करणार आहे.

हेही वाचा - Womens Asia Cup T20 2022 : महिला आशिया चषक 2022 स्पर्धेला आजपासून सुरुवात, भारत-श्रीलंका दुसऱ्या सामन्यात भिडणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.