विशाखापट्टणम: उत्तर बंगालच्या उपसागरात भारतीय नौदल-बांगलादेश नौदल समन्वित गस्त (CORPAT) ची चौथी आवृत्ती रविवारी सुरू झाली. या दोन दिवसीय लष्करी सरावात स्वदेशी बनावटीची भारतीय नौदलाची जहाजे कोरा आणि सुमेधा आणि बांगलादेशी नौदलाची जहाजे बीएनएस अली हैदर आणि बीएनएस अबू उबैदा सहभागी झाल्या आहेत.
भारतीय नौदल जहाज कोरा हे मार्गदर्शित-क्षेपणास्त्र कॉर्व्हेट आहे आणि सुमेधा हे एक ऑफशोअर गस्ती जहाज आहे. दोन्ही नौदलाची सागरी गस्ती विमानेही समन्वित गस्तीमध्ये सहभागी होतील. या दरम्यान भारतीय नौदल आणि बांगलादेशच्या नौदल तुकड्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर संयुक्त गस्त घालतील. शेवटचा भारतीय नौदल-बांगलादेश नौदलाचा समन्वयित गस्त सराव ऑक्टोबर 2020 मध्ये आयोजित करण्यात आला होता.