IND vs WI 3rd T20 Result : भारत व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी- २० मालिका सुरू झाली आहे. या मालिकेत तिसरा सामना मंगळवारी (२ ऑगस्ट ) दिवशी झाला. सेंट किट्समधील बॅस्टेअर वॉर्नर पार्क येथे हा सामना झाला आहे. श्रेयस अय्यर याच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने हा सामना 7 गडी राखून जिंकला आहे. यामुळे 5 सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-१ अशी आघाडी होती. वेस्ट इंडीजने भारताला १६५ धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिलता मैदानात उतरलेल्या भारतीय खेळाडू सावध सुरुवात केली होती.
मात्र, कर्णधार रोहित शर्माला दुखापतीच्या कारणास्तव सामन्या मधून बाहेर पडावे लागले आहे. यानंतर सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांनी सामन्याला आकार दिला. दोघांमध्ये 86 धावांची भागीदारी केली आहे. या दरम्यान, सूर्यकुमार यादवने 44 चेंडूत 76 धावा फटकावले आहे. ऋषभ पंतने नाबाद ३३ धावा काढले आहेत, आणि १९ व्या षटकामध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे वेस्ट इंडीजला प्रथम फलंदाजीसाठी उतरावे लागले होते.
यजमानांनी प्रथम फलंदाजी करत असताना 5 गडी गमावून १६४ धावा केले आहेत. सलामीवीर कायले मेयर्सने ५० चेंडूत ७३ धावा केल्या. तर त्यामध्ये 8 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. यानंतर कर्णधार निकोलस पूरनने २२, शिमरॉन हेटमायरने २० तर रोव्हमन पॉवेलने २३ धावांचे योगदान काढले आहे. भारताच्या वतीने भुवनेश्वर कुमारने 2 तर अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी 1 बळी घेतला आहे. भारताने पहिला टी- २० सामना ६८ धावांनी जिंकला होता. तर, दुसऱ्या सामन्यात ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत शेवटचे 2 सामने फ्लोरिडामध्ये होणार असल्याचे समजतं आहे.
हेही वाचा - घाबरणाऱ्यातला मी नाही, सहनशीलतेचा अंत पाहू नका.. उदय सामंत यांचा हल्लेखोरांना इशारा