ETV Bharat / bharat

IND vs WI 1st ODI : नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा गोलंदाजीचा निर्णय; पहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन - जेसन होल्डरला कोरोणाची लागण

भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) संघात नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पहिल्या वनडे मालिकेला सातला सुरुवात होणार आहे.

IND vs WI
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
author img

By

Published : Jul 22, 2022, 6:59 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन: भारत आणि वेस्ट इंडिज संघाच आज वनडे मालिकेतील पहिला सामना ( IND vs WI 1st ODI ) क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होणार होईल. तत्पुर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( West Indies opt to bowl ) आहे. त्याचबरोबर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.

गेल्या काही महिन्यांत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे, प्रत्येक द्विपक्षीय मालिकेत आपले सर्वोत्तम खेळाडू वगळणे देशांसमोर आव्हान बनले आहे. विशेषत: यावर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाबाबत संघांनी आपली बेंच स्ट्रेंथ आजमावण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताकडे नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह नाहीत. त्याचबरोबर दुखापतीमुळे रवींद्र जडेजाला देखील प्लेंइंग इलेव्हन मधून वगळण्यात आले ( Ravindra Jadeja dropped from playing XI ) आहे.

अलीकडेच गयाना येथे वेस्ट इंडिजने बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावल्यामुळे, नेदरलँड, पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या सामन्यांतून विश्रांती घेतल्यानंतर आघाडीचा अष्टपैलू जेसन होल्डरचे पुनरागमन ( All-rounder Jason Holder Comeback ) झाले आहे. पंरतु त्याला कोरोनाची लागण झाल्याने प्लेंइंग इलेव्हनमध्ये संधी ( Jason Holder infected with Corona ) मिळालेली नाही.

भारत (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप (यष्टीरक्षक), ब्रॅंडन किंग, शमारह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी आणि जयडेन सील्स.

हेही वाचा - T-20 World Cup : 'या' खेळाडूचा पत्ता होणार कट, रिकी पाँटिंगने सांगितली आपली निवड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.