ETV Bharat / bharat

IND vs SA 5th T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील निर्णायक सामन्यावर फेरले पाणी; पावसामुळे पाचवा सामना रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील खेळला जात असलेला पाचवा ( IND vs SA 5th T20 ) सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाची धावसंख्या 3.3 षटकात 2 बाद 28 अशी झाली होती, तेव्हा पावसाला सुरुवात झाली आणि खेळा वाया गेला.

IND vs SA 5th T20
IND vs SA 5th T20
author img

By

Published : Jun 19, 2022, 10:53 PM IST

बंगळुरू: रविवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका ( IND vs SA 5th T20 ) यांच्यातील खेळला जात असलेला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द केला ( 5th T20 abandoned due to rain ) आहे. सामन्याच्या अगोदर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघात नाणफेक पार पडली. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामना सुरु होण्यापूर्वी पावसाला सुरुवात झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला होता.

सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Opener Rituraj Gaikwad ) बाद झाला, तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 3.3 षटकात 2 बाद 28 अशी झाली होती. त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि खेळ थांबवण्यात आला. तेव्हा श्रेयस अय्यर (0) आणि रिषभ पंत (1) धावांवर नाबाद होते. सर्वांना आशा होती की, काही कालावधीनंतर पाऊस थांबेल आणि खेळ पुन्हा सुरु होईल, परंतु पावसाने सर्वांचीच निराशी केली. त्यामुळे पंचांनी सामना रद्द केल्याची घोषणा केली.

दरम्यान, ही मालिका 2-2 ने बरोबरीत पार पडली. त्यामुळे मालिकेचा चषक कोणालाही मिळाला नाही. परंतु या मालिकेसाठी मालिकावीर म्हणून भुवनेश्वर कुमारला सन्मानित करण्यात ( Bhuvneshwar Kumar player of the Series ) आले. कारण त्याने चार सामन्यात शानदार गोलंदाजी करताना 6 विकेट्स घेतल्या.

हेही वाचा - Neeraj Chopra Declares : नीरज चोप्राने डायमंड लीग स्पर्धेसाठी फिट असल्याचे केले जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.