सिडनी: संक्षिप्त धावफलक
भारत: 20 षटकांत 2 बाद 179 (विराट कोहली नाबाद 62, रोहित शर्मा 53, सूर्यकुमार यादव नाबाद 51; पॉल व्हॅन मीकरेन 1/32).
नेदरलँड्स: 20 षटकांत 9 बाद 123 (टिम प्रिंगल 20; भुवनेश्वर कुमार 2/9, अक्षर पटेल 2/18, रविचंद्रन अश्विन 2/21, अर्शदीप सिंग 2/37).
भारताचा डाव: भारताने 20 षटकात 2 गडी गमावून 179 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने केवळ 25 चेंडूत नाबाद 51 धावा काढल्या. तर कर्णधार रोहित (39 चेंडूत 53) आणि विराट कोहली याने 44 चेंडूत नाबाद 62 धावा करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७३ आणि सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ९५ धावा अशा दोन महत्त्वाच्या भागीदारी रचल्या. केएल राहुलचे सलग दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला (१२ चेंडूत ९ धावा).
नेदरलँड्सचा डाव: प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघाने २० षटकांत ९ गडी गमावून केवळ १२३ धावा केल्या. नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (१७), मॅक्स ओडौड (१६), बॅस डे लीड (१६) आणि पॉल व्हॅन मीकरन (१४) यांनी दोन आकडी धावसंख्या गाठली. यांच्या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या एकही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.