हैदराबाद - ऑस्ट्रेलियाने भारतापुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या रुपात दोन धक्के बसले. पण त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी धडाकेबाज फटकेबाजी करत सामना विजयाकडे नेला. त्यामुळेच भारताला या सामन्यात सहा विकेट्स राखून विजय मिळवता आला. सूर्याने यावेळी ६९ धावा केल्या, तर कोहलीने ६३ धावांची जोरदार फटकेबाजी केली.
नागपूरच्या ओल्या मैदानामुळे आठ षटकांच्या झालेला सामना भारताने जिंकून या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील ( IND vs AUS T20 Series ) आपले आव्हान जीवंत ठेवले आहे. त्यामुळे आता मालिकेतील अंतिम आणि निर्णायक सामन्यात आज हैदराबाद येथे दोन्ही संघ आमनेसामने होते. कर्णधार म्हणून रोहित शर्माला सलग नववी मालिका जिंकण्याची ही मोठी संधी होती. ती त्याने साधली. तर ऑस्ट्रेलिया घरच्या मैदानावर भारताला दुसऱ्यांदा पराभूत करणारा पहिला संघ होण्याच्या मार्गावर होता. परंतु, भारताने हा सामना पलटवला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): आरोन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, टीम डेव्हिड, जोश इंग्लिस, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.