ETV Bharat / bharat

PM Modis advice to Tejashwi Yadav : पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर तेजस्वी यादव लागले कसरती, मोदींनी दिला होता 'हा' सल्ला - Physical exercise of Tejashwi Yadav

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि तेजस्वी यादव ( Tejashwi Yadav ) यांनी भेटीदरम्यान आरोग्यविषयक चर्चा केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस्वींना वजन कमी करण्याचा सल्ला दिला. आज तेजस्वींनी त्यांचे वडील आधी चालवित असलेली जुनी जीप ओढतानाचा आणि ढकलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला.

PM Modis advice to Tejashwi Yadav
पंतप्रधानांच्या सल्ल्यानंतर तेजस्वी यादव
author img

By

Published : Jul 25, 2022, 9:43 PM IST

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आरोग्यविषयक सल्ल्याला राजद नेते तेजस्वी यादव ( RJD leader Tejashwi Yadav ) यांनी गांभीर्याने घेतलेले ( Prime Ministers advice to Tejashwi Yadav ) दिसतेय. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे, यादवांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सुरू केले असून वजन कमी करण्यासाठी शारीरिक कसरती ( Physical exercise of Tejashwi Yadav ) करण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन आठवड्यात दोनदा स्वतःच्या शारीरिक कसरतींचा व्हिडिओ सोशल मीडियावर ( Tejashwi shared video of playing cricket ) टाकणारे ते पहिलेच विरोधी पक्षनेता ठरले आहे.

  • उसे गुमाँ है कि हमारी उड़ान कुछ कम है
    हमें यक़ीं है कि ये आसमान कुछ कम है।
    pic.twitter.com/wFLapFHl19

    — Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) July 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेजस्वी यादव यांचा क्रिकेट व्हिडिओ - तेजस्वी यांनी त्यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत लिहिले़, जीवन हे खेळाप्रमाणे आहे. प्रत्येकाने जिंकण्यासाठी जगले पाहिजे. मी कित्येक वर्षांनंतर क्रिकेट खेळतोय. ते म्हणतात जेव्हा ड्रायव्हर, स्वयंपाकी, सफाई कामगार, माळी आणि काळजी घेणारे तुमचे खेळाचे सोबती असतात आणि तुम्हाला हिट आणि बॉल आउट करण्यास उत्सुक असतात तेव्हा ते अधिक समाधान होते.

  • Life or game, one should always play to win. The more you plan in head, the more you perform on field.

    Pleasure to try hands on bat & ball after ages. It becomes more satisfying when driver, cook, sweeper, gardener & care takers are your playmates and keen to hit & bowl you out. pic.twitter.com/ChvK9evzi2

    — Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तेजस्वी उत्तम क्रिकेटर आणि खवय्ये - पंतप्रधान मोदी 12 जुलैला बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्यात भाग घेण्यासाठी पाटणात होते. यावेळी भेटीदरम्यान मोदी आणि तेजस्वी यादवांनी आरोग्यविषयक चर्चा केली. विशेष म्हणजे मोदींनी तेजस्वींना वजन कमी करण्याचा सल्ला दिला. आज तेजस्वींनी त्यांचे वडील आधी चालवित असलेली जुनी जीप ओढतानाचा आणि ढकलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. तेजस्वी यादव पूर्वी क्रिकेटर होते मात्र शारीरिक दुखापतीनंतर त्यांनी क्रिकेटला रामराम ठोकला होता. लग्नानंतर त्यांचे वजन 10 किलोने वाढून 85 इतके झाले. ते खवैय्ये असून त्यांना मांसाहारात ग्रिल्ड चिकन, फिश फ्राय आणि मटन आवडते. यासह त्यांना चॉकलेट शेकही आवडतो. मोदींच्या सल्ल्यानंतर त्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार नियंत्रित करत तळलेले पदार्थ आणि मिष्ठान्न वर्ज केले. तेजस्वी यादव अलीकडे पालेभाज्या आणि विना तेलाचे पदार्थ खात आहे. त्यांच्या जवळच्या सहयोगींनी नाव न छापण्याच्या अटीवर ईटीवी भारतला ही माहिती दिली.

वजन नियंत्रणासाठी व्यायाम - सहयोगी म्हणाला, राजश्री यादव यांनी तेजस्वी यादव यांना मोदींच्या सल्ल्यास आवाहन म्हणून स्वीकारत वजन कमी करण्यासाठी व्यायाम करण्यास सांगितले. तेजस्वी यादव माजी क्रिकेटर असल्याने त्यांना वजन नियंत्रणासाठी कोणता व्यायाम करावा याची माहिती आहे. ते 10 सर्क्युलर रोड परिसरात सायकलिंगचा सराव करीत असून काही महिन्यात त्यांचे वजन कमी होईल असा त्यांना विश्वास आहे.

वजन कमी करण्यासाठी गाळतात आहे घाम - तेजस्वी यांनी खानपान नियंत्रित केले असून ते डाएटचे काटेकोरपणे पालन करीत आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रोफेशनल क्रिकेटर होते आणि 2009 साली त्यांची झारखंडमधून राज्यस्तरीय क्रिकेट संघाकरिता निवड करण्यात आली होती. इंडियन प्रीमियर लीग करिता दिल्ली डेयरडेविल्सच्या टीम सदस्य असण्यासोबतच त्यांनी सैयद मुश्ताक अली ट्रॉफी सामनाही खेळला आहे.

हेही वाचा - CBI Busts Rajya Sabha Seat Scam : 100 कोटींमध्ये राज्यसभेची जागा; लातूरच्या एकासह सीबीआयने केला टोळीचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.