चेन्नई (तमिळनाडू): आयकर दिनाच्यादिवशी तामिळनाडूमध्ये जास्तीत जास्त कर भरल्याबद्दल प्राप्तिकर विभागाने अभिनेते रजनीकांत यांना पुरस्कार दिला ( Income Tax department honored Rajinikanth ) आहे.
आयकर दिनानिमित्त चेन्नईमध्ये प्राप्तिकर विभागातर्फे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आयकर भरल्याबद्दल अभिनेता रजनीकांत यांना पुरस्कार देण्यात ( Rajinikanth highest tax payer In Tamil Nadu ) आला. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांच्या हस्ते विशेष अतिथी म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अभिनेता रजनीकांत या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांची मोठी मुलगी ऐश्वर्याने त्यांच्या जागी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी बोलताना तमिलिसाई म्हणाल्या, "पंतप्रधान मोदींच्या सततच्या प्रयत्नांमुळे जनता योग्य पद्धतीने कर भरण्यासाठी पुढे आली आहे. प्रत्येकाने सरकारला कर भरावा. जर आपण कर भरला नाही तर आपले अस्तित्वच नष्ट होईल".
हेही वाचा : धनुषसोबत घटस्फोट झाल्यानंतर रजनीकांतची मुलगी ऐश्वर्या करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण