ETV Bharat / bharat

तेलंगणा : 3 नक्षलवाद्यांना ठार करण्यात पोलिसांना यश; एके-47 रायफल ताब्यात - Three Maoists killed telangana

राज्याच्या सिमेवरील मुलुगू जिल्ह्यातील पेरूर जवळ पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही घटना काल सकाळी घडली होती. पोलीस आणि नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली, यात नक्षलवादी ठार झाले.

Three Maoists killed In Encounter telangana
3 नक्षलवादी ठार तेलंगणा बातमी
author img

By

Published : Oct 26, 2021, 4:01 PM IST

Updated : Oct 26, 2021, 10:55 PM IST

तेलंगणा - राज्याच्या सिमेवरील मुलुगू जिल्ह्यातील पेरूर जवळ पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ही घटना काल सकाळी घडली होती. पोलीस आणि नक्षलवद्यांमध्ये चकमक झाली, यात नक्षलवादी ठार झाले.

हेही वाचा - भाजप, आरएसएसकडून होणारा खोटा प्रचार रोखण्यासाठी आपल्याला एकजुटीने लढणे गरजेचे -सोनिया गांधी

एके-47 रायफल जप्त

घटनास्थळावरून एसएलआर आणि एके-47 रायफल्ससह 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, पळालेल्या नक्षलवाद्यांसाठी मोठी शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या घटनेमुळे मुलुगू जिल्ह्यातील एजन्सी परिसरात खळबळ उडाली आहे.

ऐइता उर्फ ऐताडू आणि मूरचाकी, अशी मृत नक्षलवाद्यांची नावे

पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली आहे. ऐइता उर्फ ऐताडू आणि मूरचाकी, अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत. ऐता हा भद्राद्री कोट्टागुडेम जिल्ह्यातील चारला मंडळातील थिम्मापुरम येथील रहिवासी आहे. तिसऱ्या व्यक्तीची ओळख अध्याप पटलेली नाही.

हेही वाचा - समीर वानखेडे दिल्लीला पोहचले, म्हणाले महत्वाच्या कामासाठी आलोय

Last Updated : Oct 26, 2021, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.