पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा पश्चिम बंगाल दौरा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी पश्चिम बंगालचा दौरा रद्द केला आहे. अशी माहिती त्यांनी ट्विट करुन दिली आहे.
महाराष्ट्रात आज 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल होणार!
महाराष्ट्रासाठी प्राणवायू घेऊन 'ऑक्सिजन एक्सप्रेस' महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. अशी माहिती स्वत: रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विटरवरुन दिली आहे. जवळपास 100 टन ऑक्सिजन घेऊन ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना झाली आहे. ही एक्सप्रेस आज महाराष्ट्रात दाखल होऊ शकते.
'ब्रेक द चेन' मोहिमेचा पहिला दिवस
महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहे. 22 एप्रिलच्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत राज्यात हे कडक निर्बंध राहणार आहे.
१८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी उद्यापासून नोंदणी
१८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी को-विन संकेतस्थळ आणि आरोग्य सेतू अॅपवर उद्यापासून नोंदणी सुरू होणार आहे.
आज कामदा एकादशी
आज चैत्र शुद्ध कामदा एकादशी.. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्यात द्राक्ष आणि द्राक्ष वेलींच्या सहाय्याने मनमोहक सजावट करण्यात आली आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील संजय टिकोरे यांनी मंदिर समितीला या आकर्षक सजावटीसाठी द्राक्षे दिली आहे.
हॅप्पी बर्थडे मनोज बाजपेयी
अभिनेता मनोज बाजपेयीचा आज वाढदिवस आहे. मनोजने आपल्या अभिनयाने फिल्मी जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचे प्रमुख सिनेमे तमन्ना, फिजा, जुबैदा, एलओसी कारगिल, जागो फरेब, राजनिती, आरक्षण, सरकार ३, बागी 2 असे सिनेमे आहे.
आयपीयलमध्ये आज पंजाबविरोधात मुंबईची लढत
आयपीयलमध्ये आज पंजाब किंग्ज विरोधात मुंबई ईडियन्स अशी लढत पाहायला मिळणार आहे. सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअरवर हा समना होणार आहे.