ETV Bharat / bharat

NewsToday : आज या घडामोडींवर असणार खास नजर - आजच्या बातम्या

देशासह राज्यातील खालील घडामोडींवर आज खास नजर असणार आहे. विविध क्षेत्रासंदर्भातल्या या सर्व घडामोडी आहेत.

NewsToday
NewsToday
author img

By

Published : Apr 9, 2021, 6:47 AM IST

  • आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून सुरुवात
    NewsToday
    आयपीएल

चेन्नई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला आजपासून (ता. ९) सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला प्रेक्षकांची उपस्थिती नसणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र, असे असले तरी या दोन तुल्यबळ संघांमधील सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

  • सचिन वाझेला आज कोर्टात करणार हजर
    NewsToday
    सचिन वाझे

मुंबई - सचिन वाझेला आज एनआयए कोर्टात हजर करणार आहे. आज वाझेची कोठडी संपत आहे. अँटिलिया कार स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती.

  • आरोग्यमंत्री आज घेणार राज्यातल्या कोरोना स्तिथीचा आढावा
    NewsToday
    आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई - राज्यात कोरोनाची स्तिथी बिकट होत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते यासंदर्भातली माहिती प्रसारमाध्यमांना देण्याची शक्यता आहे.

  • पुण्यात व्यापारी आज दुकाने उघडी ठेवणार
    NewsToday
    व्यापारी दुकाने सुरू करणार

पुणे - राज्य सरकारने कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कडक निर्बंध अर्थात मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. या लॉकडाऊनला राज्यातील व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यातील व्यापारी दुकाने उघडणार आहेत.

  • भंडारा जिल्ह्यात आज येणार 24 हजार कोरोना प्रतिबंधात्मक लस
    NewsToday
    कोरोना लसीकरण

भंडारा - गुरुवारी भंडारा जिल्ह्यात केवळ तीन हजार लस उपलब्ध असून, शुक्रवारी पुन्हा 24 हजार नवीन लस जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते गुरुवारी भंडारा जिल्ह्यात कोरोना विषयी आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.

  • भाजप खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषद
    NewsToday
    नारायण राणे

मुंबई - भाजप खासदार नारायण राणे यांची आज पत्रकार परिषद होणार आहे. राणे यावेळी वाझे प्रकरणावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष करण्याची शक्यता आहे.

  • जेपी नड्डा यांचा आज पश्चिम बंगालमध्ये रोड शो
    NewsToday
    जेपी नड्डा

कोलकाता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा आज पश्चिम बंगालमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राजर्हाट गोपाळपूर येथे हा रोड शो होणार आहे.

  • भारत-चीन सैन्यांची आज बैठक
    NewsToday
    भारत-चीन

नवी दिल्ली - भारत आणि चीन दोन्ही सैन्यांमध्ये आज उच्चस्तरीय बैठक होणार आहे. याआधी दहावेळा बैठका झाल्या होत्या. आजची ही बैठक अकरावी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.