- कोरोनाबाबत पंतप्रधान आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत साधणार संवाद
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधणार आहेत. वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या आणि लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदी हे आढावा घेणार आहेत.
- दत्ता इस्वलकर यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार
मुंबई - गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांचे 7 एप्रिलला दीर्घ आजाराने निधन. मुंबईत जे जे हाँस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज(8 एप्रिल) सकाळी वरळी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
- मिनी लॉकडाऊनचा आज चौथा दिवस
मुंबई - राज्यात कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे राज्यात कडक निर्बंध अर्थात मिनी लॉकडाऊन लागू केला आहे. या मिनी लॉकडाऊनचा आज चौथा दिवस आहे. कोरोना संदर्भातले अनेक नियम कडक केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
- भाई जगताप यांची पत्रकार परिषद
मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांची आज दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आहे. राज्यातील विविध मुद्द्यांवर ते भाष्य करण्याची शक्यता आहे.
- परमबीर सिंग यांची जबानी घेण्याची शक्यता
मुंबई - परमबीर सिंग यांची जबानी आज पहिल्या टप्प्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हफ्ते वसुलीसंदर्भात गंभीर आरोप केले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
- आजपासून दौंड-पुणे-दौंड 'मेमू' रेल्वे सुरू
दौंड-पुणे-दौंड दरम्यान आजपासून 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरु होत आहे. ही गाडी सुरु व्हावी यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने पाठपुरावा करत होत्या.
- आज बंगालमध्ये भाजपचे आंदोलन
बंगालः -दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता. त्या निषेधार्थ भाजप आज आंदोलन करणार आहे. पश्चिम बंगालमधील सर्व विधानसभा क्षेत्रात हे आंदोलन करण्यात येणार आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
- लखनऊ, कानपूर आणि वाराणसीमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू
उत्तर प्रदेश - सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील लखनऊ, कानपूर आणि वाराणसीमध्ये आजपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्ण वाढत असून, मृत्यूदरही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
- भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर
कोलकाता - सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे आज पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. अलिपुरद्वार आणि दिनहाटा येथे त्यांचा रोड शो होणार आहे.