ETV Bharat / bharat

माझा कुस्तीशी आता काहीही संबंध नाही, संजय सिंह माझे नातेवाईक नाहीत - ब्रिजभूषण शरण सिंह - विनेश फोगट

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाला क्रीडा मंत्रालयानं बरखास्त केलं आहे. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं तातडीनं आयोजन करणं तसंच क्रिडा नियमांचं पालन न केल्याचा ठपका भारतीय कुस्ती महासंघावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळं भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तसंच भारतीय कुस्तीपटूंमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Brij Bhushan Sharan Singh
Brij Bhushan Sharan Singh
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 9:36 PM IST

नवी दिल्ली Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघानं कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यकारिणीची बैठक बोलावली. तसंच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं तातडीनं आयोजन केल्याप्रकरणी केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. भारतीय महासंघानं या स्पर्धेचं आयोजन करताना नियमांचं पालन न केल्याचा ठपका क्रिडा मंत्रालयानं ठेवला आहे. तसंच ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मतदारसंघातील नंदिनी नगरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्यानं साक्षी मलिकसह अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर क्रीडा मंत्रालयानं ही कारवाई केली.

  • VIDEO | "WFI elections were held on SC directions. Further, Sanjay Singh is not my relative. To resume the sports activities and not waste a year of young wrestlers, it was decided to conduct the games in Nandini Nagar. Now, I do not have anything to do with wrestling and have to… pic.twitter.com/8bf9xC0Lnk

    — Press Trust of India (@PTI_News) December 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू : महिला कुस्तीपटू तसंच कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. आता या वादात सरकारनंही हस्तक्षेप केला असून, ब्रिजभूषण शरण सिंह यांना जोरदार धक्का दिला आहे. रविवारी क्रीडा मंत्रालयानं 'डब्ल्यूएफआय'चे (भारतीय कुस्ती संघ) नवे अध्यक्ष संजय सिंहसह त्यांची कार्यकारिणी बरखास्त केलीय. त्यामुळं कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह तसंच भारतीय कुस्तीपटूंमध्ये आरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत.

  • #WATCH | On suspension of the newly elected body of Wrestling Federation of India (WFI) by Union Sports Ministry, Wrestler Sakshi Malik says, "I have not seen anything in writing yet. I don't know whether only Sanjay Singh has been suspended or the entire body has been… pic.twitter.com/J3ELFd98rC

    — ANI (@ANI) December 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

माझा कुस्तीशी संबंध नाही : यावेळी ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक झालीय. त्यानंतर संजय सिंह यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. संजय सिंह हे माझे नातेवाईक नाहीत. आम्ही दोघे वेगवेगळ्या समाजातून आलो आहोत. या संदर्भात जुन्या समितीनं एक निर्णय घेतला. अंडर-20, अंडर-15 राष्ट्रीय स्पर्धांबाबतचं सत्र 31 डिसेंबरला संपणार होतं. त्यानंतर खेळाडूंची निवड केल्यास एक वर्ष वाया जाईल. यामुळं महासंघाच्या सर्व सदस्यांनी मिळून हा निर्णय घेतला. कोणत्याही परिस्थितीत खेळाचं वातावरण सुरू व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आता माझा कुस्तीशी संबंध नाहीय. आता सरकारशी बोलून कायदेशीर प्रक्रियेनुसार काम करायचं आहे. त्याबाबत कुस्ती संघाचे लोक निर्णय घेतील. माझ्याकडं अजून खूप काम आहे. आता जे काही घडतंय त्याच्याशी माझा काही संबंध नाही.

आमच्या मुलींना न्याय मिळावा : ज्या काही बातम्या सुरू आहेत, त्या मी मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहे. माझ्याकडं याबाबत कोणताही पुरावा नाही. दोन दिवसांपासून ही स्पर्धा नंदनी नगरमध्ये होणार असून चाचणी लखनौमध्ये होणार असल्यामुळं मला त्रास होत आहे. जेव्हा मला संपूर्ण माहिती कळेल, तेव्हा मी तुम्हाला पुढील नियोजनाबाबत सांगेल. आमची लढाई ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याशी आहे, आमच्या मुलींना न्याय मिळावा, अशी आमची इच्छा आहे. तसेच निवृत्ती मागे घेण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याची माहिती साक्षी मलिकने दिली.

मला पत्र मिळालं नाही : या प्रकरणाबाबत बोलताना संजय सिंह म्हणाले, मी फ्लाइटमध्ये होतो. ते पत्र काय आहे, ते मला माहिती नाही. आतापर्यंत मला कोणतंही अधिकृत पत्र मिळालेलं नाही. भारतीय कुस्ती महासंघाच्या निलंबनाबाबत माझ्याकडं कोणतीही ठोस माहिती नाही.

काय आहे प्रकरण : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका 21 डिसेंबरला पार पडल्या. निकालानुसार, संजय सिंह यांची WFI चे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. संजय सिंह हे भाजपाचे खासदार तसंच भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळचे आहेत, असा आरोप आहे. त्यामुळं 21 डिसेंबर रोजी साक्षी मलिकनं कुस्ती सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर, 22 डिसेंबर रोजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियानं आपला पद्मश्री पुरस्कार दिल्ली पोलिसांकडं परत केला. डंब रेसलर उर्फ ​​वीरेंद्र सिंह यादवनंही या खेळाडूंच्या समर्थनार्थ आपला पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा -

  1. कुस्तीपटूंच्या विरोधानंतर क्रीडा मंत्रालयाला जाग; भारतीय कुस्ती महासंघाची मान्यता रद्द
  2. Maharashtra Kesari Final : महाराष्ट्र केसरीची आज अंतिम लढत, 'या' मल्लांमध्ये रंगणार सामना
  3. Wrestlers Sexual Abuse Case : ब्रिजभूषण सिंह कुस्तीपटू महिला लैंगिक शोषण प्रकरणात आरोपपत्र दाखल, न्यायालय आज दखल घेण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.