दिवाळी (Deewali) आता सोमवार, 24 ऑक्टोबरला आहे. या दिवशी चंद्र बुधासोबत कन्या राशीत असेल. तसेच सूर्य आणि शुक्र तूळ राशीत असतील. अशा परिस्थितीत यावेळी दिवाळी हा एक चांगला योगायोग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, दिव्यांचा सण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या (lakshmi) स्वागतासाठी घराच्या दारात वेगवेगळ्या रंगांनी रांगोळी काढली जाते. वास्तुशास्त्रात रांगोळी काढण्याचे स्वतःचे महत्त्व आहे. घराच्या दारावर रांगोळी काढल्याने घरातील नकारात्मकता दूर होते. पण, रांगोळी काढताना रंग आणि दिशा लक्षात ठेवायला हवी. चुकूनही या चुका करू नका.
जर तुम्ही बाजारातून रेडिमेड रांगोळी विकत घेत असाल तर त्यामध्ये गणपती, लक्ष्मी किंवा इतर कोणत्याही देवतेची प्रतिमा नसावी हे नक्की लक्षात ठेवा. असे झाल्यास, तुमचे पैसे गमवावे लागू शकतात. रांगोळी स्वतः काढत असलो तरी देवतेची प्रतिमा वापरू नका.
जर तुम्ही स्वतःच्या हातांनी रांगोळी काढत असाल तर लक्षात ठेवा की, त्यावर स्वस्तिक किंवा ओमचे प्रतीक बनवू नका. वास्तूनुसार रांगोळी बनवताना रंगांची विशेष काळजी घेतली पाहिजे. पूर्व दिशेला पिवळा, लाल, हिरवा आणि गुलाबी रंग वापरून रांगोळी काढणे चांगले. उत्तर दिशेला जांभळा आणि केशरी रंग वापरा.
वास्तूनुसार दक्षिण दिशेला लहरिया डिझाइनची रांगोळी अजिबात बनवू नका. दक्षिण दिशेला आयताकृती रांगोळी काढल्याने फायदा होतो. रांगोळी उत्साहाचे प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असे म्हटले जाते. घरात आनंद, शांती आणि उत्सवाचा प्रवाह असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो.
शास्त्रानुसार रांगोळी काढल्याने घरामध्ये एकाच ठिकाणी आकर्षणाचे केंद्र बनते. धनत्रयोदशीपासून दिवाळीपर्यंत दररोज स्नान केल्यानंतर सकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावा. पाऊलखुणा घरामध्ये आतील बाजूस येणे आवश्यक आहे. यामुळे घरात लक्ष्मी येते.