ETV Bharat / bharat

IAS Officer Phone Tapping : माझा फोन टॅप होतोय, तिसरी व्यक्ती संभाषण ऐकते - महिला IAS अधिकाऱ्याचे टि्वट

भोपाळमधील एका आयएएस महिला अधिकाऱ्याने ( bhopal ias officer tweet on Phone Tapping ) सोशल मीडियावर फोन टॅपिंग संदर्भात टि्वट केले आहे. त्यांचे हे ट्विट सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. फोनवरील आपले बोलणे तिसरी व्यक्ती ऐकत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Preeti Maithil Nayak
प्रीती मैथिल नायक
author img

By

Published : Feb 19, 2022, 1:06 PM IST

Updated : Feb 19, 2022, 1:23 PM IST

भोपाळ - भोपाळमधील एका आयएएस महिला अधिकाऱ्याने सोशल मीडियावर टि्वट करत एका घटनेचा संदर्भ देत फोनवरील आपले बोलणे तिसरी कोणीतरी व्यक्ती ऐकत असल्याचे म्हटलं आहे. त्यांचे हे ट्विट ( bhopal ias officer tweet on Phone Tapping ) सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. आयएएस महिला अधिकाऱ्याने एका पेनाच्या जाहिरातीचा फोटोही टि्वट केला आहे. प्रीती मैथिल नायक असे या आयएएस महिला अधिकाऱ्याने नाव आहे.

ias-officer-asked-to-search-pen-to-pa-on-phone-matter-reached-facebook-showing-advertisement
आयएएस महिला अधिकाऱ्याचे टि्वट

एखाद्या आयएएस अधिकाऱ्याने फोन टॅपिंगवर भाष्य केल्याची ही मध्य प्रदेशातील पहिलीच घटना आहे. प्रीती मैथिल नायक यांनी ट्विटरवर लिहिले की, हे खूप भीतीदायक आहे. आदल्या दिवशी एका परिषदेत माझा पेन हरवला. पेन महाग असल्याने मी ते शोधण्यासाठी काही कॉल केले. तो पेन हॉल किंवा लॉबीमध्ये सापडतो की नाही हे पाहण्यासाठी मी माझ्या PA ला देखील कॉल केला. यानंतर मला माझ्या फेसबुक पेजवर पेनासंदर्भातील जाहिराती दिसून लागल्या. माझा पेन हरवला ही गोष्ट फेसबुकपर्यंत पोहोचली. त्यांच्या या पोस्टनंतर युजर्संनी विविध कॉमेंट केल्या असून हे प्रकरण फोन टॅपिंगशी जोडत प्रश्न केले आहेत.

यावर 'मला फोन टॅपिंग म्हणायचे नाही. आपण मोबाईलवर बोलतो. ते कोणीतरी तिसरी व्यक्ती ऐकत आहे. त्यामुळेच आपल्या आवडीच्या गोष्टी गुगल किंवा सोशल साईटवर दिसायला लागतात. हे अत्यंत चुकीचे आहे. आता काहीही सुरक्षित नाही', असेही नायक यांनी म्हटलं.

'फोन टॅपिंग' म्हणजे नेमकं काय?

फोन टॅपिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्या फोनवरील संभाषण ऐकणे किंवा त्याचं रेकॉंर्डिंग करणे होय. त्यामुळे एखाद्याची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. भारतीय टेलीग्राफ कलम 1885 नुसार तो गुन्हा नव्हता. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्यांना फोन टॅप करण्याची परवानगी होती.कालांतराने या कायद्यात सुधारणा करण्यात आली. कलम 419 व 419अ नुसार फोन टॅपिंगवर बंदी घालण्यात आली आहे.मात्र गृहमंत्रालयाच्या परवानगीने एखाद्याचा फोन टॅप करू शकतो हे अधिकार फक्त काही विभागांना देण्यात आले आहे. या यंत्रणा देशाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. या एजन्सीद्वारे ज्या व्यक्तीचा फोन टॅप केला जाणार आहे. त्या व्यक्तिची संपूर्ण माहिती गृहमंत्रालयाला देणे बंधनकारक आहे.

हेही वाचा - वर्ष २०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता; नाना पटोलेंनी केला गंभीर आरोप

Last Updated : Feb 19, 2022, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.