ETV Bharat / bharat

Human Centric Globalization : जी २० च्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम् चा मोदींचा संकल्प, सर्वांना सोबत घेण्याचा व्यक्त केला इरादा - Taking G20 to the Last Mile

Human Centric Globalization : भारत जी-२० परिषदेचा यजमान अध्यक्ष आहे. यानिमित्तानं जी-२० च्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम् चा संकल्प पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला आहे. सर्वांना सोबत घेऊन जगाचा विकास साधण्याची मनिषा त्यांनी स्पष्ट केली आहे. एक वैश्विक कुटुंब म्हणून प्रगती करण्यास ही संकल्पना प्रेरणा देते असं मोदींनी म्हटलं आहे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात मानव केंद्रित विकासाचं आवाहन त्यांनी केलंय. वाचा पंतप्रधान मोदींनी लिहिलेला हा लेख...(PM Modi writes article on G20)

Human Centric Globalization
Human Centric Globalization
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2023, 1:45 PM IST

Updated : Sep 7, 2023, 2:46 PM IST

Human Centric Globalization : ‘वसुधैव कुटुंबकम’ या दोन शब्दात मोठं तत्त्वज्ञान दडलंय. संपूर्ण जग हेच एक कुटुंब असा याचा अर्थ आहे. सार्वत्रिकदृष्ट्या कुटुंब म्हणून प्रगती करण्यासाठी देशकालाच्या सीमा, भाषा आणि विचारसरणीच्या पलीकडे जाण्याची प्रेरणा देणारा हा एक सर्वसमावेशक दृष्टीकोन आहे. मानव केंद्रित विकासाचं आवाहन भारताच्या G-20 अध्यक्षपदाच्या काळात आपण संपूर्ण जगाला करत आहे. या पृथ्वीवरील एकच कुटुंब म्हणून या वसुंधरेचं पालनपोषण करण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. त्याच दृष्टीकोनातून कुटुंब म्हणून विकासाच्या प्रयत्नात आम्ही एकमेकांना साथ देत आहोत. आजच्या परस्परावलंबी काळामध्ये आपण एकत्रितपणे एकाच सामुदायिक भविष्याकडे वाटचाल करत आहोत, हे एक निर्विवाद सत्य आहे.

  • The magnificent Nataraja statue at Bharat Mandapam brings to life aspects of our rich history and culture. As the world gathers for the G20 summit, it will stand as a testament to India's age-old artistry and traditions. https://t.co/uFEcx22jgi

    — Narendra Modi (@narendramodi) September 6, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोना नंतरचे बदल - कोरोना महामारीनंतरची जागतिक व्यवस्था ही आधीच्या जगापेक्षा खूपच बदललेली आहे. यामध्ये तीन महत्त्वाचे बदल झाल्याचं दिसून येतं. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंतच्या जगाच्या जीडीपी-केंद्रित दृष्टिकोनापासून मानव केंद्रित दृष्टिकोनाकडे वळण्याची गरज असल्याची जाणीव वाढली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांना सावरताना जागतिक पुरवठा साखळीतील लवचिकता आणि विश्वासार्हतेचं महत्त्व जगानं ओळखलं आहे. तसंच तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जागतिक संस्थांच्या सुधारणेतून सामुहिक प्रगतीला चालना देण्याची गरज अधोरेखित झाली आहे .

दुर्लक्षितांच्या कल्याणासाठी भारत - भारताच्या जी-२० अध्यक्षपदाने या सगळ्या बदलांसाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावली आहे. इंडोनेशियामध्ये डिसेंबर 2022 मध्ये जेव्हा आम्ही जी-२० चं अध्यक्षपद स्वीकारलं, तेव्हा मी लिहिलं होतं की, आपली मानसिकता बदलणं आवश्यक आहे. विशेषत: जगाच्या दक्षिण भागातील तसंच आफ्रिकेतील विकसनशील देशांच्या दुर्लक्षित आकांक्षांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.

प्रगतीची घसरण रोखण्याची गरज - व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट हा १२५ देशांचा सहभाग असलेला भारताच्या अध्यक्षतेखालील उपक्रम हा त्याचाच एक भाग होता. या माध्यमातून ग्लोबल साऊथकडून माहिती आणि कल्पनांचा उहापोह करणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. भारताच्या नेतृत्वाखाली यातूनच आमचा आफ्रिकन युनियनला जी-२० चे कायम सदस्य म्हणून समाविष्ट करण्यावर भर राहिला आहे. एका अर्थानं एकमेकांशी जोडलेलं जग म्हणजे आव्हानंही एकमेकांशी जोडलेली आहेत. जागतिक टिकावू प्रगतीचं 2030 चं लक्ष्य गाठण्यासाठी हा मध्यकाळ आहे. याचवेळी ही प्रगती घसरणीला लागल्याची चिंता सर्वांनाच आहे. त्यामुळे या प्रगतीला गती देण्यासाठी जी-२० चा २०२३ कृती आराखडा भविष्यातील दिशादर्शक ठरेल.

विकासाकरता तंत्रज्ञान - प्राचीन काळापासून भारत एक निसर्गानुकूल आदर्श देश राहिला आहे. आजच्या आधुनिक काळातही हवामान उत्तम राखण्यासाठी भारत कृतीशिलतेनं आपला वाटा उचलत आहे. जगाच्या दक्षिण भागातील अनेक देश विकासाच्या विविध टप्प्यांवर आहेत. त्याचवेळी या देशांनी हवामान बदलाचा मागोवा घेऊन समतोल प्रगती साधण्याची गरज आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापराची निकड आहे.

हवामान बदलाशी पूरक दृष्टीकोन - यासाठी नकारात्मक बाबींच्या ऐवजी हवामान बदलाशी लढण्यासाठी काय केलं जाऊ शकतं यावर लक्ष केंद्रित करावं लागेल. त्यासाठी पूर्ण प्रतिबंधांचा दुराग्रह सोडण्याची गरज आहे. तसंच अधिक रचनात्मक काम केलं पाहिजे. निरंतर आर्थिक विकासाच्या प्रयत्नात महासागर दूषित होऊ नये यासाठी चेन्नईतील केंद्र कार्यरत आहे. ग्रीन हायड्रोजन इनोव्हेशन सेंटरच्या माध्यमातून भारताच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ आणि हरित हायड्रोजनसाठी जागतिक परिसंस्था उदयास येत आहे. भारतानं इंटरनॅशनल सोलर अलायन्सची २०१५ साली स्थापना केली. आता, ग्लोबल जैवइंधन अलायन्सच्या माध्यमातून, भारत अर्थव्यवस्थेच्या सर्वंकष फायदेशीर सक्षमीकरणास भारत जगाच्या पाठीशी राहील.

लाइफस्टाईलमध्ये बदलाचा संकल्प - हवामानाची काळजी घेण्यासाठी यासंदर्भातील लोकचळवळीला गती द्यावी लागेल. एखादी व्यक्ती आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी काही उपाययोजना करत असते, त्याप्रमाणेच प्रत्येकानं वसुंधरेच्या आरोग्यावरही विपरित परिमाण होणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे. योगाभ्यास जशी एक जागतिक जनचळवळ झाली आहे, त्याचप्रमाणे पर्यावरणासाठीही प्रत्येकानं लाइफस्टाईलमध्ये बदलाचा संकल्प केला पाहिजे. (Lifestyles for Sustainable Environment)

पोषणासाठी उपाययोजना - जगातील प्रत्येकाला पौष्टिक अन्नाचा पुरवठा करणं हवामान बदलाच्या प्रभावामुळे किचकट झालं आहे. बाजरीसारख्या तृणधान्यांच्या शेतीला प्राधान्य देऊन याची सुनिश्चितता करता येईल. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षात आम्ही बाजरी जागतिक स्तरावर नेली आहे. भारत Deccan High Level Principles on Food Security and Nutrition या संस्थेच्या माध्यमातून यादृष्टीने प्रयत्नरत आहे.

परिवर्तनासाठी डिजीटल तंत्रज्ञान - परिवर्तनासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे. पण ते सर्वसमावेशक करायला पाहिजे. मागील काळात तांत्रिक प्रगतीचे फायदे समाजातील सर्व घटकांना समान रीतीने मिळाले नाहीत. त्याचवेळी भारतानं गेल्या काही वर्षांमध्ये दाखवून दिलंय की, तंत्रज्ञानाचा वापर विषमता कमी करण्यासाठी कसा होऊ शकतो. आज जगातील अब्जावधी लोकांना बँकिंग किंवा डिजीटल जगाची साधी ओळखही नाही. त्यांना आपल्या डिजीटल सार्वजनिक पायाभूत सुविधा देऊन (DPI) मुख्य आर्थिक प्रवाहात आणलं जाऊ शकतं. भारतानं DPI वापरून आता जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. आता जी-२० च्या माध्यमातून, आम्ही त्याच्या सर्वसमावेशकतेसाठी प्रयत्न करू.

भारतीय महिलांची आघाडी - भारत ही सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, हे अपघातानं घडत नाही. भारतानं साध्या तसंच निरंतर शाश्वत उपायांनी असुरक्षित आणि उपेक्षितांना विकासाच्या प्रवाहात आणलं आहे. अवकाशापासून क्रीडा, अर्थव्यवस्थेपासून उद्योजकतेपर्यंत विविध क्षेत्रात भारतीय महिलांनी आघाडी घेतली आहे. महिलांच्या विकासापासून महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे देश प्रगतीशील आहे. भारताचं जी-२० चं अध्यक्षपद हे डिजीटल दरी भरून काढण्यासाठी, कामगार शक्तीच्या सहभागातून नेतृत्व आणि निर्णय घेण्यामध्ये महिलांची भूमिका सक्षम करण्यासाठी काम करत आहे.

भारताची जगाला जवळून ओळख - भारतासाठी, जी-२० अध्यक्षपद हे केवळ उच्चस्तरीय राजनैतिक संधी नाही. तर लोकशाहीची माता आणि विविधतेचे एक आदर्श मॉडेल म्हणून आम्ही या अनुभवाची दारे जगासाठी उघडली आहेत. आज, मोठ्या प्रमाणावर एखादी गोष्टी तडीस नेणे हा भारतीयांचा आणि भारताचा एक गुण आहे. जी-२० अध्यक्षपदही त्याला अपवाद नाही. ही एक लोकचळवळ झाली आहे. भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात १२५ देशांतील सुमारे एक लाख प्रतिनिधींसाठी वैविध्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या आमच्या महाकाय देशातील ६० शहरांमध्ये २०० बैठकांचं आयोजन करण्यात आलं.

जगाची साद ऐकण्यासाठी कटिबद्ध - खरं तर भारताची लोकसंख्या, लोकशाही, विविधता आणि विकास याविषयी दुसऱ्याकडून ऐकण वेगळं आणि त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेणं हे पूर्णपणे वेगळं आहे. मला खात्री आहे की जी-२० प्रतिनिधींना याचा उत्तम प्रत्यय आला असेल. भारताचं जी-२० अध्यक्षपद हे विभाजनाच्या फुटीमध्ये पुलाचं काम करून त्यातील अडथळे दूर करण्याबरोबरच सहकार्याची बीजे पेरण्यासाठी प्रयत्नशील आहे. जागतिक एकता टिकवून अलिप्ततेचं ग्रहण सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. G20 चे अध्यक्ष या नात्याने, आम्ही प्रत्येकाचा आवाज ऐकला जाईल आणि प्रत्येक देश जागतिक विकासात योगदान देईल याची खात्री देण्याचा प्रयत्न केला. जागतिक परिप्रेक्ष मोठं करण्याचं वचन भारतानं दिलं होतं. त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला नक्कीच वाटतं.

Last Updated : Sep 7, 2023, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.