नवी दिल्ली : हिवाळा आला आहे आणि तापमानात दररोज घट होत आहे. त्यातच लोकांना हाडे आणि सांधेदुखीचे दुखणे सहन करणे कठीण होत आहे. हिवाळ्यात सांधेदुखी ही एक किंवा अधिक सांध्यांमध्ये वाढलेल्या जळजळमुळे होते. शरीरातील जॉईंट असलेल्या भागांमध्ये रक्ताचा पुरवठा कमी होत असल्यामुळे सांधे कडक होतात, त्यामुळे सांधे आणि हाडे दुखतात.
संधिवाताचा त्रास अधिक : सांधेदुखी हिवाळ्याच्या ऋतुमध्ये त्रास देते. ज्यामुळे विशेषतः संधिवात असलेल्या रुग्णांचे जीवन कठीण होते. यामध्ये जर का रुग्णांनी योग्य ती काळजी घेतली नाही तर, त्या दुखण्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो. शिवाय याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर देखील होतो. सांध्यांमध्ये होणाऱ्या प्रचंड वेदना टाळण्यासाठी आपण काही उपाय करु शकतो.
व्हिटॅमिन डी कमतरता : हिवाळ्याच्या हंगामात सांधेदुखीचा सामान्य प्रकार आहे. कारण थंड हवामानामुळे बोटे आणि पायाचे रक्त भिसरण होणे कमी होऊ शकते, ज्यामुळे सांधेदुखी वाढू शकते. कमी तापमानात स्नायू देखील आकुंचण पावतात, स्नायूंना परिणामी कडकपणा आणि वेदना होतात. याशिवाय, लोक हिवाळ्यात घरामध्येच थांबतात, ज्यामुळे शरीराला सूर्यप्रकाश मर्यादित मिळतो आणि परिणामी 'व्हिटॅमिन डी' ची कमतरता होऊ शकते.
सांधेदुखी कमी करण्यास खास टिप्स : हायड्रेटेड राहण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी आणि जॉईंट पार्ट वरिल घर्षण कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या. हिवाळ्यात घालायचे कपडे वापरा, हिटरने घर गरम ठेवा आणि इतर आवश्यक वस्तूंमध्ये स्वतःला उबदार ठेवा. नियमित व्यायामामुळे तुमचे सांधे लवचिक राहण्यास आणि लवचिकता राखण्यास मदत होईल. व्यायाम केल्याने सांध्यांचे घर्षण आणि रक्त प्रवाह सुधारण्यात देखील मदत करू शकते. किमान अर्धा तास तरी सकाळच्या कोवळ्या उन्हात राहा, यामुळे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.
संतुलित आहार घ्या : व्हिटॅमिन सी, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, आले, सोयाबीन, फॅटी मासे, हिरव्या भाज्या, नट आणि बिया, भरपूर पाणी आणि इतर कोलेजन सप्लिमेंट्स असलेला संतुलित आहार सांधे आणि हाडांसाठी उपयुक्त ठरेल. हिवाळ्याच्या काळात काळजी घ्या. शरीराच्या नियमित हालचालींमुळे तुमच्या सांध्यातील लवचिकता वाढेल. ज्या लोकांचे वजन जास्त आहे, त्यांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. गुडघे निरोगी ठेवण्यासाठी व्यक्तीने त्याचे वजन कमी राखले पाहिजे.