मेष : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. कदाचित आठवड्याच्या सुरवातीस आपल्या खर्चात वाढ होईल. परंतु, हा आठवडा आपण आनंदात घालवू शकाल. नवीन काही करण्याचा प्रयत्न न करता जसे चालले आहे तसे चालू ठेवण्यास प्राधान्य देऊन समाधानी व्हाल. आपणास कुटुंबिय व मित्रांसह वेळ घालविण्यास आवडेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आशादायी आहे. आपण आपल्या प्रेमिकेस मनातील विचार सांगाल, व ती त्याचा स्वीकार करेल. त्यामुळे आपले संबंध अधिक दृढ होतील. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाचे यथोचित फळ मिळेल. त्यांची बढती संभवते. बढती मिळाल्याने आपली कार्यक्षमता वाढेल. व्यापाऱ्यांना शासनाकडून लाभ सुद्धा मिळू शकतो. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर आपले लक्ष केंद्रित करावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण खूप मेहनत करता. काहीवेळा मेहनतीस नशिबाची जोड सुद्धा लागते. ह्या आठवड्यात नशिबाची साथ आपणास मिळेल व त्यामुळे प्रत्येक काम शक्य तितके लवकर पूर्ण करण्यास आपले प्राधान्य राहील. आपले मनोबल उंचावेल. नोकरी करणाऱ्यांना ह्याचा खूप लाभ होऊन कामात प्रगती होईल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगला आहे. आपला व्यावसायिक भागीदार आजारी पडण्याची संभावना असल्याने आपणास आपली कामे स्वतःलाच करावी लागतील. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपला वैवाहिक जोडीदार काहीसा चिंतेत राहील. आपल्या खर्चात वाढ होईल, ज्यावर आपणास नियंत्रण ठेवावे लागेल. प्रेमीजनांसाठी हा आठवडा आनंददायी आहे. आपण अनेक लोकांना भेटून आपले संबंध अधिक दृढ करू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. ते स्पर्धेत यशस्वी होऊ शकतील.
मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपणास शासनाकडून चांगला लाभ होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. खर्चात थोडी कपात झाल्याने आपणास दिलासा मिळू शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. प्रेमीजनांना प्रणयी जीवनात सुखद परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शिकवणीची गरज भासू शकते. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी नवीन आशेचा किरण घेऊन येणारा आहे. त्यांना आपल्या कामात लाभ होण्यासाठी काही नवीन लोकांची आवश्यकता भासेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल. अनेकजण आपल्या सल्ल्यानुसार काम करून फायदा मिळवू शकतील. त्यामुळे कार्यालयात आपला मान वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना आपला अभ्यास एकाग्रतेने करावा लागेल. आपण स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण ऑनलाईन व्यवसाय करण्याचा विचार कराल, जो आपल्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. व्यापारी आपल्या कामांना गती देतील. त्यांना उपयुक्त होतील अशा दीर्घकालीन योजना ते आखू शकतील. नोकरी करणाऱ्यांना ह्या आठवड्यात थोडे सावध राहावे लागेल. त्यांची कामगिरी चांगली झाली तरी कामाच्या ठिकाणी काही विरोधक आपल्या विरुद्ध तक्रार करण्याची शक्यता आहे. हा आठवडा विवाहितांसाठी खूपच चांगला आहे. आपला वैवाहिक जोडीदार आपल्या सहवासाने आनंदित होऊन आपणास खुश ठेवण्याचा प्रयत्न करेल. प्रेमीजनांची ह्या आठवड्यात काहीशी निराशा संभवते. त्यांना आपल्या प्रेमिकेची वागणूक आवडणार नाही. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. काहीजण उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यात यशस्वी होतील. आपली प्रकृती चांगली राहील. आपले मनोबल उंचावेल. आठवड्याच्या मध्यास कुटुंबात थोडे तणावाचे वातावरण राहण्याची किंवा एखाद्याची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह: हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपले मन प्रसन्न होईल. खर्च नियंत्रित करून आपण उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रकृती चांगली राहिल्याने आपण जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांच्या मदतीने काही नवीन कामे करण्याचा विचार आपण कराल. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी लाभदायी आहे. व्यापाऱ्यांना व्यापार वृद्धी करण्यात यशस्वी होऊन आपल्या कामात नैपुण्य मिळविता येईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. आपण आपले प्रणयी जीवन मुक्तपणे जगून आपल्या इच्छेनुसार वागू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. व्यापारात नफा वाढल्याने आपण अजून नवीन काम करण्याचा विचार कराल. आपली व्यवसायात प्रगती होईल. आपणास शासनाकडून लाभ होण्याची संभावना सुद्धा आहे. बाजारातील अनुभवी लोकांचे सहकार्य सुद्धा मिळू शकेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात चांगले परिणाम मिळतील. विवाहितांना संबंधात उब जाणवेल. ते आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. आपण कुटुंबियांसह एखाद्या लांब पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन सुद्धा करू शकाल. प्रेमीजन आपल्या प्रेमिके कडून जाहीरपणे प्रेमाच्या कबुलीची अपेक्षा बाळगतील. ह्याचे कारण म्हणजे त्यांना प्रेमिकेच्या तोंडून काही गोष्टी ऐकावयास आवडते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आपली कुशाग्र बुद्धिमत्ता आपली ज्ञानवृद्धी करण्यास मदतरूप होईल. नवीन शिकण्याची जिज्ञासा आपल्या उपयोगी येईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
तूळ :हा आठवडा आपल्यासाठी अंशतः फलदायी आहे. आपण परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकाल. आपण सध्या जेथे काम करता तेथून इतर शहरात किंवा राज्यात स्थलांतर करू शकाल. खर्चात वाढ होईल. आपणास थोडे आर्थिक नियोजन करून वाटचाल करावी लागेल. प्राप्ती सामान्यच राहील. विद्यार्थ्यांना त्यांची एकाग्रता कमी झाल्याने अभ्यासातील चढ - उतारांना सामोरे जावे लागेल. विवाहितांचे विवाहिक जीवन सुखावह होईल. संबंधातील प्रेम वाढेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपणास संबंधांच्या बाबतीत गंभीर व्हावे लागेल. प्रेमात दोघांनाही समान जवाबदारीने राहावे लागते, हे समजून घ्यावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. त्यांचे शिक्षण व्यवस्थित होईल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण प्रवास करू शकाल. कामा निमित्त आपणास भरपूर प्रवास करावा लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन प्रेमाने व स्नेहाने भरलेले असेल. त्यांना एखादा मोठा लाभ झाल्याने ते आपल्या वैवाहिक जोडीदारासाठी एखादी अद्भुत भेटवस्तू आणू शकतील. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सुद्धा चांगला आहे. आपण आपल्या संबंधांप्रती खूपच गंभीर व्हाल. आपल्या प्रेमिकेस विवाहाची मागणी सुद्धा आपण घालू शकाल. आपल्या कडून मित्रांना सुद्धा चांगली बातमी ऐकावयास मिळाल्याने ते आपले प्रणयी जीवन दृढ करण्यात मदत करतील. हा आठवडा नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपण आपल्या कामात प्रगती करू शकाल. आपल्यात चांगली ऊर्जा असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले गुण मिळू शकतील. स्पर्धेत सुद्धा ते यशस्वी होऊ शकतील. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
धनू : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. मानसिक चिंतेतून बाहेर पडून वास्तविक्तेवर आपले लक्ष केंद्रित करणे आपल्या हिताचे होईल. आपली प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. प्रॉपर्टीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने आपण खुश व्हाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपण कामात अति व्यस्त राहिल्याने आपल्या वैवाहिक जोडीदारास दिलेल्या वचनांचा आपणास विसर पडेल. हे अयोग्यच आहे. असे काही होऊ नये याची काळजी घ्यावी. प्रेमीजन आपल्यातील सर्जनात्मकता व कार्यक्षमतेच्या जोरावर आपल्या प्रेमिकेस आकर्षित करण्यात यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामांप्रती जागरुक राहतील. पूजा समजून कामे केल्याने त्यांना चांगले परिणाम मिळतील. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्य फलदायी आहे. त्यांना एखादे नवीन काम मिळण्याची संभावना सुद्धा आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढेल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मकर : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आठवड्याच्या सुरवातीस आपण भरपूर प्रवास कराल. मित्रांसह फिरावयास जाल किंवा धार्मिक यात्रा कराल. ह्या आठवड्यात आपण अनेक धार्मिक यात्रा करू शकाल. आपल्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकेल. कोणतेही काम केलेत तरी ते लक्षपूर्वकच करावे लागेल. नोकरी करणाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. परंतु, आपल्यावर नोकरी गमावण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. तेव्हा सावध राहावे. आपले काम अचूकपणे करावे. आपण जर नोकरी सोडलीत तरी त्वरित आपण दुसरी नोकरी मिळवू शकाल व त्यामुळे कोणतीही समस्या उदभवणार नाही. आपण व्यवसायात तटस्थ राहिल्याने चांगले परिणाम मिळवू शकाल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. सासुरवाडीकडे काही चांगले प्रसंग घडण्याची संभावना आहे. प्रेमीजन काहीसे निराश होतील. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आठवड्याचा अखेरचा दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपणास मुलांकडून चांगली बातमी ऐकावयास मिळेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील जुन्या समस्या दूर झाल्याने काळजीचे कारण राहणार नाही. संबंधात रोमांसाचे पुनरागमन होईल. संबंधात नावीन्य येईल. आपण दुसरे जीवन जगत असल्याचे आपणास जाणवेल. चेहेऱ्यावर हास्याची लकेर उठेल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य लाभेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. आपणास प्रेमिकेची भेट घेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यापारी आपल्या कामाप्रती जागरूक राहतील. आपली कौशल्यपूर्ण कार्य योजना आपला विश्वास द्विगुणित करेल. दूरवरच्या विस्तारात केलेला व्यवसाय लाभदायी होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आपली कामे लक्षपूर्वक करावी लागतील. इतरांशी गप्पाष्टक करून आपले नुकसान होण्याची संभावना आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. त्यांना अभ्यासात चांगले यश प्राप्त होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मीन :हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपण आपला व्यवसाय वाढविण्यासाठी दूरवरच्या शहरांचा व राज्यांचा प्रवास करू शकाल. त्यात आपणास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. परंतु, प्रवासापूर्वी संपूर्ण तयारी करून ठेवावी. एखाद्या महिलेच्या मदतीने आपल्या कामात वाढ होण्याची संभावना सुद्धा आहे. नोकरी करणाऱ्यांना आपले काम पुढे दाखविण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपले काम लोकांच्या नजरेस भरेल. आपणास आपल्या व्यक्तिगत प्रयत्नाने चांगला आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकेल. जर आपला वैवाहिक जोडीदार काम करत असेल तर ते अति व्यस्त राहण्याची शक्यता आहे. आपला वैवाहिक जोडीदार अति व्यस्त राहिल्याने आपणास वैवाहिक जीवन सुखावह करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी विवाह बंधनात अडकण्यासाठी पुढे जाऊ शकाल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अनेक अडथळे येण्याची संभावना असल्याने त्यांना आपली एकाग्रता वाढवावी लागेल. आठवड्याचा पहिला व अखेरचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. Weekly horoscope, What will be the position of the planets, 18 TO 24 DECEMBER, HOROSCOPE FOR THE WEEK