ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना 'शिव नवरात्री'चा हा आठवडा ठरेल भाग्यकारक; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य - ग्रहांची स्थिती

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Feb 12, 2023, 5:10 AM IST

साप्ताहिक राशीभविष्य

मेष राशी : आठवड्याच्या सुरवातीस मानसिक तणाव राहील. वैवाहिक जीवनात सुद्धा काही समस्यांचा सामना करावा लागेल. त्यामुळे आपण चिंतातुर व्हाल. परंतु जोडीदाराशी संवाद साधून सर्व समस्यांवर मात करू शकाल. प्रेमीजनांना आपल्या प्रेमिकेस महत्व देण्यास शिकावे लागेल, अन्यथा नात्यात नकारात्मकता वाढेल. ह्या आठवडयात किरकोळ खर्च होत राहतील, परंतु प्राप्तीत सुद्धा वाढ होत असल्याचे दिसून येईल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपण नोकरी करत असलेल्या ठिकाणी आपला रुबाब वाढेल. आपल्या मान - सन्मानात सुद्धा वाढ होईल. आपण आपले काम व आपली प्रतिष्ठा यांच्या जोरावर आपले स्थान मजबूत कराल. व्यापाऱ्यांना स्वतःला व्यक्त करावे लागेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा आहे. अभ्यासात कोणत्याही प्रकारे अडथळा येणार नाही ह्यासाठी त्यांना प्रयत्न करावे लागतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ राशी : ह्या आठवड्यात आपणास मोठे बदल होत असल्याचे दिसून येईल. प्रणयी जीवन सुखावह होईल. आपण आपल्या प्रेमिकेसह फिरावयास जाऊ शकता. विवाहित व्यक्तींचा आपल्या जोडीदाराशी वाद होण्याची संभावना आहे. आपणास आपल्या विरोधकांपासून खूप सतर्क राहावे लागेल, अन्यथा ते आपली झोप उडवतील. त्यामुळे आपणास मानसिक त्रास होईल. ह्या आठवड्यात आपल्या खर्चात वाढ होण्याची संभावना असल्याने आपल्या खिशावर ताण पडेल. प्राप्ती कमी होईल. व्यापारी आपल्या कामात तज्ञ होतील. आपल्या कामामुळे ते चांगले नांव व प्रतिष्ठा मिळवतील. त्यांना चांगली प्राप्ती होऊन लाभ सुद्धा होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सध्या खूप मेहनत करतील. काही नवीन लोकांमुळे त्यांच्यावर कामाचा भार वाढू शकतो. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण नवीन विषयांचा अभ्यास सुद्धा कराल. आरोग्य विषयक कोणतीही समस्या होईल असे दिसत नसले तरी आपणास आपल्या दिनचर्येत नियमितपणा ठेवावा लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन राशी :हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनात चढ - उतार जाणवतील. जोडीदाराच्या वागणुकीमुळे आपणास अधून - मधून थोडा त्रास सुद्धा होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास आपल्या प्रेमिकेचे सहकार्य मिळेल. आपण दोघे एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकाल. त्यामुळे आपल्यातील गैरसमज व त्रास दूर होतील. आठवड्याच्या सुरवातीस आपणास स्वतःच्या ऊर्जेतील कमतरता जाणवेल. कोणत्याही कामात आपले लक्ष लागणार नाही. परंतु आठवड्याच्या मध्या पर्यंत परिस्थितीत बदल होईल. आपल्या खर्चात वाढ होईल. आपण प्राप्तीत वाढ करण्याचे प्रयत्न कराल. नोकरीच्या ठिकाणी आपण इमानदारीत कामे कराल. कार्यस्थळी वेळेवर पोचून आपण स्वतःला जवाबदार व अनुशासित व्यक्ती म्हणून सिद्ध करू शकाल. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. सध्या कोणतीही नवीन गुंतवणूक करू नये. विद्यार्थी आपल्या मेहनतीने स्वतःची प्रगती करू शकतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. कोणत्याही प्रकारे आरोग्य विषयक त्रास होईल असे दिसत नाही. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क राशी : ह्या आठवड्याची सुरवात आपल्यासाठी काहीशी नाजूकच असेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जोवनातील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील, त्याचा त्यांना फायदा सुद्धा होईल. नात्यात सुधारणा करण्याची वेळ आल्याने जे काही गैरसमज होते ते हळू हळू दूर होऊ लागतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपल्यातील जवळीक वाढल्याने आपले नाते अधिक दृढ होईल. सध्या आपण मानसिक तणावाखाली वावरत असाल. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास खूप प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामाच्या बाबतीत वेळेचे बंधन पाळावे लागेल. कार्यालयात वेळेवर पोचल्यास उशिरा येण्याचा शिक्का आपल्या माथी लागू शकणार नाही. व्यापारासाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या व्यवसायाची वृद्धी करू शकाल. त्याचा आपणास फायदा सुद्धा होईल. विद्यार्थी आपल्या अध्ययनाच्या बाबतीत अत्यंत कार्यरत राहतील. असे असून सुद्धा त्यांचे मन विचलित करणाऱ्या काही गोष्टी घडतील. आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपणास आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह राशी : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांनी भरलेला आहे. विवाहितांना वैवाहिक जीवन सुखद असल्याचे जाणवेल. आपण एकमेकांप्रती आपल्या जवाबदाऱ्या पार पाडाल. तसेच घरातील वातावरण सकारात्मक करण्याचा प्रयत्न कराल. आपले प्रणयी जीवन सुखावह होईल. त्यात आपणास काही चांगले अनुभव येतील. प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. एखाद्या विवाह सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. मित्रांच्या बाबतीत काही समस्या वाढण्याची शक्यता असल्याने त्यांच्याशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करावा. नोकरी करणाऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांशी चांगला समन्वय साधावा लागेल, अन्यथा ते आपल्या विरुद्ध एखादे षडयंत्र रचून आपणास त्रास देऊ शकतील. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होण्याची संभावना आहे. आपण व्यापार वृद्धीसाठी काही नवीन लोकांशी सुद्धा संपर्क साधाल. विद्यार्थ्यांचे अध्ययन उत्तम होईल. स्पर्धेत यशस्वी होण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार संभवतात. अशा परिस्थिती आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून दिनचर्येचे नियमितपणे पालन करावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या राशी : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांना ह्या आठवड्यात प्रणयात यश मिळेल. आपल्या प्रणयी जीवनात दृढता येईल. आपणास आपल्या प्रेमिकेची बुद्धिमत्ता व बौद्धयांक समजून घेण्याची संधी मिळेल. तीआपणास एखादा उपयुक्त ठरेल असा सल्ला देऊ शकते. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य उत्तम असेल. ह्या आठवड्यात आपण आपल्या कुटुंबासाठी काही करण्यास इच्छुक असाल. आपण जर व्यापार करत असाल तर थोडे सावध राहावे. आपलीच माणसे आपल्या विरुद्ध काही काम करतील कि ज्यामुळे आपण अडचणीत येऊ शकाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल असली तरी आपल्या मनात नोकरी बदलण्याचे विचार येण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ते अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ज्ञानवृद्धी होईल. बुद्धी विकसित झाल्याने अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला आहे. कोणत्याही प्रकारची मोठी समस्या होईल असे दिसत नाही. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

तूळ राशी : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कौटुंबिक परिस्थितीवर आपले लक्ष राहील. आपण आपल्या जवाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाल. कुटुंबाच्या गरजा समजून घेऊन कुटुंबियांशी प्रेमाने वागाल. आपणास कुटुंबियांचे पूर्ण सहकार्य लाभेल. सध्या आपण मानसिक दृष्ट्या त्रासलेले असाल. अशावेळी कुटुंबीय आपल्या मदतीस धावून येतील. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात थोडा त्रास जाणवेल. दांपत्य जीवनात सासुरवाडी कडील लोकांचा हस्तक्षेप वाढल्याने आपणास खूप त्रास होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपल्या आर्थिक स्थितीत चढ - उतार येतील. आपणास गुप्तपणे धन मिळण्याची संभावना आहे. आपण प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. ग्रहस्थिती आपल्या कामात मदतरूप ठरेल. व्यापाऱ्यांना आपल्या कामात मजबुती जाणवेल. आपल्या व्यापाराची वृद्धी होईल. आपणास चांगल्या ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. ते काही नवीन विषयात सुद्धा लक्ष घालू शकतील. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा अनुकूल आहे. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक राशी : हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. आता खर्चात वाढ व प्राप्ती सामान्यच होईल. आपणास संतती सौख्य मिळेल. दांपत्य जीवन आनंदित राहील. जोडीदाराशी एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या मनातील भावना प्रेमिके समोर व्यक्त करण्यात यशस्वी व्हाल. आपण दोघेही एकमेकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात एकमेकांना सहकार्य कराल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपले सहकारी आपणास सहकार्य करतील. वरिष्ठांचा सुद्धा पाठिंबा मिळेल. ह्या आठवड्यात आपणास एखादे नवीन काम मिळण्याची संभावना आहे, जे आपल्यासाठी आव्हानात्मक असू शकते. त्यामुळे आपली प्रतिभा व कार्यकुशलता दिसून येईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास लाभ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास विरोधकांचा त्रास सतावेल, परंतु आपण त्यांच्यावर मात करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते आपल्या अध्ययनात प्रगती करू शकतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार होत असल्याचे दिसून येईल. अशा परिस्थितीत आपणास आपल्या प्रकृती विषयी जागरूक राहावे लागेल. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनू राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असल्याने आपण खुश व्हाल. जोडीदाराशी सुद्धा सलोखा राहील. आपण दोघे मिळून घरासाठी काही खर्च कराल. संततीशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेसाठी काही खास करण्याचा प्रयत्न कराल. परंतु, घाईघाईत असे कोणतेही कृत्य करू नका कि ज्यामुळे आपल्या हातून एखादी चूक होऊन संबंध दृढ होण्या ऐवजी कटू होतील. ह्या आठवड्यात येणारा पैसा काही कारणाने अडकू शकतो. अशा वेळी प्राप्तीच्या बाबतीत आपणास थोडा त्रास संभवतो. परंतु धीर धरा. काही वेळ लागला तरी पैसा परत मिळू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मजबूत होतील. व्यापाऱ्यांना काही चढ - उतारांचा सामना करावा लागेल. ह्या दरम्यान आपले काम सुद्धा कमी होऊ शकते. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती सामान्यच राहील. मसालेदार व तेलकट आहार टाळणे हितावह होईल. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. ह्या आठवड्यात कौटुंबिक वातावरणात असंतुलन राहील. काही कारणाने जोडीदाराशी वाद संभवतो. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा मध्यम फलदायी आहे. आपण जर आपल्या प्रेमिकेवर मनापासून प्रेम करत असाल तर तिचे लाड पुरविण्यासाठी तयार राहा. आपली बुद्धिमत्ता चोहोबाजूने आपणास यशस्वी करेल. मग आपण नोकरी करत असा किंवा व्यापार. दोन्हीकडे आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा फायदा आपणास मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत होईल. नोकरीशी संबंधित सर्व कामे तीव्र गतीने प्रगती करतील. सध्या आपल्या हाती काही नवीन कामे येण्याची संभावना असून त्यामुळे आपला फायदा होईल. आर्थिक दृष्ट्या सुबत्ता आल्याने व प्राप्तीत वाढ झाल्याने आपण खुश व्हाल. विद्यार्थ्यांना आपल्या तीव्र बुद्धिमत्तेचा लाभ होईल. अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक काही त्रास होण्याची शक्यता आहे. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ राशी : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. त्यांच्या हृदयात प्रेमिकेस एक विशिष्ट स्थान असेल. ते आपल्या प्रेमिकेस मनातील भावना मोकळेपणाने सांगू शकतील. त्यांचे एकमेकांशी चांगले सूत जमेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाचा संपूर्ण आनंद घेतील. जोडीदारा कडून समाधान झाल्यामुळे ते त्यांच्यासाठी एखादी मोठी भेटवस्तू घेऊन येतील. आठवड्याच्या सुरवातीस आपण काही मानसिक तणावाखाली वावरत असाल, परंतु कालांतराने हाच तणाव आपणास यशस्वी होण्याचा मार्ग दाखवेल. अचानकपणे नशिबाशी संबंधित एखादी चांगली बातमी येऊन आपण यशस्वी व्हाल. तसेच आपणास आर्थिक लाभ सुद्धा होईल. खर्च वाढले तरी आर्थिक बाजू मजबूत असेल. कुटुंबात एखादा विवाह सोहळा किंवा समारंभ होऊ शकतो. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबीत यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण जितके कष्ट करू शकाल तितके करा, आपणास त्याचा लाभ होईल. व्यापारी आपल्या व्यवसायात यशस्वी होतील. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी बाहेरगावी जाण्याची संधी मिळू शकते. ह्या आठवड्यात आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणावास सुद्धा सामोरे जावे लागण्याची संभावना आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन राशी :हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन जरी सुखावह असले तरी सासुरवाडीकडून काही समस्या समोर येण्याची संभावना आहे. काही वाद सुद्धा संभवतात. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. एखाद्या गोष्टीमुळे प्रेमिकेशी भांडण होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे. ह्या आठवड्यात कोणत्याही प्रकारे मानसिक ताण घेऊ नये, अन्यथा समस्या वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळून ते आपल्या कामात प्रगती करतील. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. विद्यार्थी आपल्या प्रखर बुद्धिमत्तेचा लाभ घेतील. त्यांना नवीन विषयांवर पकड मजबूत करण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती काहीशी नरम - गरम राहण्याची संभावना आहे. तेव्हा आरोग्याची काळजी घेणे हितावह होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

या आठवड्याचा स्पेशल मॅजिक नंबर : आठवड्याचा स्पेशल मॅजिक नंबर 227799 आहे. लाल पेनने पूर्वेकडे तोंड करून पांढऱ्या कागदावर लिहा आणि जवळ ठेवा. विशेष जादूचा अंक तुमचे ग्रह मजबूत करेल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि चालू संकट दूर होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.