ETV Bharat / bharat

Weekly Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना हा आठवडा ठरेल भाग्यकारक; वाचा, साप्ताहिक राशीभविष्य

कसा असेल तुमचा आठवडा, अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल, वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का, मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे, येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का, जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, साप्ताहिक राशीभविष्य.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य
author img

By

Published : Mar 5, 2023, 5:21 AM IST

मेष राशी :हा आठवडा आपल्यासाठी कुटुंबियांचे प्रेम व आपुलकी घेऊन येणारा आहे. बऱ्याच कालावधी नंतर आपण आपल्या व्यस्त जीवनातून वेळ काढून कुटुंबियांना वेळ द्याल व त्यांच्या सहवासात आपला वेळ घालवाल. आपल्या माते कडून आपणास एखादी सुंदरशी भेटवस्तू मिळण्याची संभावना आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनात आनंद जाणवेल. नात्यातील संबंधात वृद्धी होईल. परंतु, प्रणयी जीवनात चढ - उतार होताना दिसून येईल. एकजूट नसल्याने भांडणाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसे पाहता ह्या आठवड्यात आपली वाढ होईल. प्राप्तीतील वाढ ठळकपणे दिसून येईल, त्यामुळे आपण आनंदित व्हाल. आपले विरोधक सुद्धा शांत राहतील. असे असले तरी दुसरीकडे आपण खरेदी व आवश्यक कामासाठी खूप खर्च सुद्धा कराल. आपण सढळहस्ते पैसा खर्च करत असल्याचे आपणास वाटेल, परंतु प्राप्ती उत्तम असल्याने काळजीस वाव राहणार नाही. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. सहकाऱ्यांशी आपले संबंध सुधारतील व त्याचा आपणास लाभ होईल. ते आपणास पाठिंबा देतील. असे असले तरी वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी एखाद्या मार्गदर्शकाची गरज भासेल. अशा परिस्थितीत एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत घ्यावी, अन्यथा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींना सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात कोणताही शारीरिक त्रास होईल असे दिसत नसले तरी आपल्या दिनचर्येवर लक्ष द्यावे. आहारात सुद्धा नियमितता राखावी. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृषभ राशी : ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास उंचावल्याचे दिसून येईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणाव दूर करण्याचा प्रयत्न करतील, त्यात त्यांना ग्रहांची साथ सुद्धा मिळेल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी चांगला आहे. आपल्या प्रेमिकेच्या आपल्याकडून अपेक्षा उंचावल्या जाण्याची संभावना आहे. त्या पूर्ण न झाल्यास ती आपल्यावर काहीशी नाराज होण्याची शक्यता सुद्धा आहे. तेव्हा तिची समजूत काढणे हे सुद्धा आवश्यकच आहे. ह्या आठवड्यात आपण आपल्या कामात यशस्वी सुद्धा व्हाल. व्यापाऱ्यांना कामा निमित्त भरपूर प्रवास करावे लागतील. आपण आपल्या कौशल्याच्या जोरावर आपल्या व्यापारास प्रगती पथावर नेऊ शकाल. आपणास चांगला फायदा होत असल्याचे दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांचे भरपूर सहकार्य व पाठिंबा मिळेल. त्यामुळे आपण आपली कामगिरी उत्तम प्रकारे करू शकाल. असे असून सुद्धा आपणास सावध राहावे लागेल. ह्या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती काहीशी प्रतिकूल असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपणास काही त्रास होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार सुद्धा मनात येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. कोणत्याही शाखेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना हा आठवडा फायदेशीर ठरणारा आहे. ह्या आठवड्यात काही कारणाने आपणास तणावास सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सावध राहावे. ध्यानधारणा केल्यास आपणास फायदा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन राशी : हा आठवडा आपल्यासाठी नवीन आनंदवार्ता घेऊन येणारा आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहिल्याने घरात पॉझिटिव्ह शक्तींचा संचार होईल व त्यामुळे कुटुंबीय खुश राहतील. वैवाहिक जीवन सुखावह होईल. जोडीदाराशी समन्वयात सुधारणा होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. तेव्हा असे कोणतेही कृत्य करू नका कि ज्यामुळे आपल्या दोघातील गैरसमज अधिक वाढतील. प्रेमिकेस फिरावयास घेऊन जाऊ शकता. ह्या आठवड्यात आपले खर्च वाढतील. कार्यक्षेत्री सुद्धा लोकांना खाऊ - पिऊ घालण्याच्या मनस्थितीत आपण असाल व त्यामुळे मेजवानीचे सातत्य चालूच राहील. नोकरीच्या ठिकाणी आपली कामगिरी उत्तम होईल. आपण आपली मेहनत चालूच ठेवाल. व्यापारी आपला व्यापार अधिक चांगल्या स्थितीत नेण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांची स्थिती मजबूत होईल. ह्या आठवड्यात विद्यार्थी अध्ययनात खूप मेहनत करत असल्याचे दिसून येईल. त्याचे त्यांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे सुद्धा दिसेल. काही विद्यार्थ्यांना परदेशात जाण्यात तर काहींना स्पर्धेत सुद्धा यश मिळू शकते. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चांगला आहे. आपण तंदुरुस्त असल्याचे दिसून येईल. असे असले तरी कोणत्याही लहान - सहान समस्येस दुर्लक्षित करू नका. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात काहीसे त्रासलेले दिसतील. जोडीदाराशी आपला समन्वय काहीसा कमी होईल, त्यामुळे ते काहीसे त्रासून जाऊ शकतात. तेव्हा त्यांना सहकार्य करा. प्रेमीजनांनी आपल्या नात्यात घाई करू नये. एकमेकांना योग्य तितका अवधी द्यावा. तसेच एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नोकरीत स्थिती मजबूत राहील. आपण आपले शिक्षण व मेहनत यांचा नोकरीत प्रयोग करून उत्तम कामगिरी करू शकाल. वरिष्ठांशी सुद्धा आपला समन्वय उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपण एखाद्या धार्मिक स्थळाचा प्रवास किंवा देव दर्शनास जाऊ शकता. व्यापारासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. एखादे मोठे नुकसान संभवते. तेव्हा आर्थिक बाबतीत सतर्क राहावे. हा आठवडा गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कामगिरी उत्तम होईल. आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपणास आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपणास एखाद्या शस्त्रक्रियेस सामोरे जावे लागू शकते किंवा एखाद्या शारीरिक दुखण्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. आरोग्याच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा. जर एखादे जुने दुखणे असेल तर अधिक काळजी घ्या. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

सिंह राशी :हा आठवडा आपल्यासाठी चढ - उतारांचा आहे. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. जोडीदाराशी काही गैरसमज संभवतात. ह्या व्यतिरिक्त आपल्या दोघात दुरावा वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. जोडीदार आजारी पडण्याची संभावना असल्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास एकमेकांच्या सहवासात काही सुखद क्षण घालविण्याची संधी सुद्धा मिळेल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तम स्थिती प्राप्त कराल. व्यापाऱ्यांना आव्हानांचा सामना करावा लागेल. एखादी सरकारी योजना आपल्या प्रगतीच्या आड येऊ शकते, तेव्हा काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात खूप मेहनत करावी लागेल. आपल्या मेहनतीमुळेच आपण यशस्वी होऊ शकाल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती सामान्यच राहील. आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या मधल्या दिवसां पासून अखेरच्या दिवसां पर्यतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कन्या राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील सर्व सुखांचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदाराशी आपली जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी मात्र आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. आपल्या समजुतीत कमतरता असल्याने भांडणाची स्थिती निर्माण होऊ शकते, तेव्हा सावध राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. आपणास आपल्या मेहनतीनुसार चांगले परिणाम मिळतील. आपले वरिष्ठ आपणास एखादे नवीन आव्हान देऊ शकतात. जे पूर्ण करून आपण त्यांचे खास व्यक्ती होऊ शकाल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत फायदेशीर आहे. आपल्या प्रयत्नांमुळे आपला व्यापार तेज गतीने वाटचाल करेल. त्यामुळे आपणास चांगला लाभ होईल. ह्या आठवड्यात आपणास खूप गुंतवणूक करावी लागेल. खर्चात सुद्धा वाढ होईल. ह्या आठवड्यात भरपूर प्रवास सुद्धा करावे लागतील. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात काही त्रास होऊ शकतो. अध्ययनात अडथळ्यास सामोरे जावे लागू शकते. तेव्हा वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करावा. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडू शकते. पोटाचे विकार किंवा एलर्जीचा त्रास संभवतो. मानसिक दृष्ट्या सुद्धा त्रास होऊ शकतो, परंतु आपला आत्मविश्वास उत्तम असल्याने आपण त्यातून सहजपणे बाहेर पडू शकाल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ राशी :हा आठवडा आपल्यासाठी चांगली बातमी घेऊन येणारा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात काहीसे चिंतीत असल्याचे दिसून येईल. जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने सुद्धा आपणास त्रास होईल. वडिलांची प्रकृती सुद्धा बिघडू शकते. असे असून सुद्धा कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. ह्या आठवड्यात आपल्या प्राप्तीत सुद्धा वाढ होईल, व त्यामुळे आपण खुश व्हाल. प्रणयी जीवनात ज्या काही कटकटी चालू होत्या त्या आता हळू - हळू संपुष्टात येऊन स्थिती नियंत्रणात येईल. आपण आपल्या प्रेमिकेस वास्तविकतेचा परिचय करून द्याल. त्यामुळे गैरसमज दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीत बदल करण्यास इच्छुक असतील, परंतु ते आपली कामे उत्तम प्रकारे करतील. त्यामुळे काही त्रास जाणवणार नाही. व्यापार चांगला चालेल व आपली गुंतवणूक सुद्धा वाढेल. विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करावा लागेल. अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होईल असे दिसत नसले तरी दिनचर्येत नियमितपणा राखावा. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक राशी : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूलतेचा आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून आले तरी कौटुंबिक समस्यां प्रति काही चिंतीत असतील. कुटुंबात एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडू शकते. आपल्या चोहो बाजूस शांतता पसरेल. जुन्या गोष्टींमुळे वाद सुद्धा होऊ शकतील. प्रेमीजनांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपले नाते अतिशय सुंदर व उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न कराल. आपल्या प्रेमिकेस हि गोष्ट मनापासून आवडेल. आपणास नशिबाची साथ मिळेल व त्यामुळे कामात यश प्राप्त होईल. यश प्राप्ती मुळे आपल्या चेहेऱ्यावर हसू उमटेल. नोकरीतील समस्या काही अंशी कमी होतील. तरी सुद्धा थोडे सावध राहावे. कोणाशीही कटू बोलणे टाळावे. व्यापारासाठी आठवडा सामान्यच आहे. आपल्या योजना यशस्वी होऊन आपणास त्याचा लाभ होईल. काही नवीन लोकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल. हे संपर्क व्यापारात आपणास मदतरूप ठरतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आहे. ते मन लावून अभ्यास करतील व त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने आपणास चांगला आहे. कोणताही आरोग्य विषयक त्रास होताना दिसत नाही. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहे.

धनू राशी : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबियांच्या आशीर्वादाने आपण कामात यशस्वी व्हाल. सध्या आपणास एखादा मानसिक त्रास असू शकतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. आर्थिक नुकसान सुद्धा संभवते. ईश्वर कृपेने आपली प्रलंबित कामे सुद्धा पूर्णत्वास जातील. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या आपली स्थिती मजबूत होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर आपल्या कामास महत्व देऊ लागले तर सर्व सुरळीत होईल. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी त्यांच्याशी नीट वागावे लागेल. विद्यार्थी अभ्यासाकडे अधिक गंभीरतेने बघतील. त्याचे त्यांना चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस वगळता इतर दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर राशी : हा आठवडा आपल्यासाठी आनंदाने भरलेला असला तरी कुटुंबात होणाऱ्या भांडणांमुळे व मानसिक तणावामुळे आपणास वारंवार त्रास होईल. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदारा प्रति समर्पित होऊन कुटुंबीयांची काळजी घ्याल. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्यच आहे. आपणास आपल्या प्रेमिकेच्या चेहेऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. ह्या आठवड्यात आपणास अचानक धनलाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँकेतील शिल्लक वाढविण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्य आहे. थोडे श्रम वाढविल्यास आपणास चांगले फळ मिळू शकते. व्यापाऱ्यांना थोडे सावध राहावे लागेल. आपल्या काही योजना होता - होता स्तंभित होऊ शकतात, त्यामुळे आपल्या कामास ब्रेक लागू शकतो. त्यास गती देण्यासाठी आपण अनुभवी व्यक्तीची मदत घेऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. ते मन लावून अभ्यास करतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. मानसिक चिंता व काही खर्च आठवड्याच्या सुरवाती पासूनच आपणास त्रास देऊ शकतात. आपण एखाद्या गंभीर विचारात राहाल. त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळणार नाहीत. प्रणयी जीवनासाठी आठवडा चढ - उतारांचा आहे. असे असले तरी आपली प्रेमिका आपल्या प्रति समर्पित राहील. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात चढ - उतार येत असल्याचे जाणवेल. असे असले तरी काही अंशी जोडीदाराशी जवळीक वाढेल. त्यामुळे आपले त्रास कमी होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना ह्या आठवड्यात लक्ष पूर्वक काम करावे लागेल. आपल्या कामावर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. तेव्हा कोणाला आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल असे कोणतेही कृत्य करू नये. व्यापाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. एखादे नवीन व्यापारी कौशल्य हाती लागू शकते. विद्यार्थी मन लावून अभ्यास करू शकतील. त्यांना अध्ययनात मेहनतीचा चांगला लाभ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही मोठी समस्या नजरेस येत नसली तरी आपणास मानसिक त्रासा पासून स्वतःला दूर ठेवावे लागेल. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन राशी : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस संततीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात सुद्धा प्रेमाचे अंकुर फुटतील. जोडीदाराशी जवळीक वाढल्याने आपले नाते अधिक मधुर होईल. जोडीदारासह बाहेर फिरावयास जाऊ शकाल. एखाद्या मंदिरात दर्शनासाठी सुद्धा जाऊ शकाल. प्रणयी जीवनासाठी आठवड्याचे सुरवातीचे दिवस अनुकूल आहेत. आपण आपल्या कल्पकतेने आपल्या प्रेमिकेचे हृदय जिंकू शकाल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावे लागेल, अन्यथा गोंधळ होऊ शकतो. हा आठवडा व्यापाऱ्यांना अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांना अध्ययनात प्रगतीची संधी मिळेल. परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आरोग्यास विशेष त्रास होताना दिसत नसला तरी आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.