मेष - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.
वृषभ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.
मिथुन - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात कामे करू शकाल. मित्र व शुभेच्छुकांचा सहवास लाभल्याने मनास आनंद मिळेल.
कर्क - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. भावनाशील व्हाल. आज काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. शक्यतो निरर्थक वाद टाळा. कोर्ट- कचेरीतील कामे जपून करा. विदेशातून काही बातमी येईल. संयमित राहा. स्त्रीयांशी सावधपणे व्यवहार करा. आज खर्चात वाढ होईल.
कन्या - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. व्यापारात धन वृद्धी संभवते. संतती विषयक आनंददायी बातमी मिळेल. वैवाहिक जीवनात सौख्य व समाधान लाभेल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवासाचे बेत आखाल.
तूळ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. माते कडून लाभ संभवतो. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगू शकाल. सहकारी चांगले सहकार्य करतील. शासकीय कार्यांत यशस्वी व्हाल.
वृश्चिक - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या तब्बेतीची काळजी राहील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अनावश्यक खर्च वाढतील. वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. शक्यतो आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. राजकीय समस्या उदभवतील.
धनू - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्यापासून सावध राहावे लागेल. उक्ती व कृती संयमित ठेवावी लागेल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कामांपासून दूर राहणे हितावह राहील. सरकार विरोधी कृत्या पासून अलिप्त राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
मकर - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. भागीदारीत लाभ होईल. सामाजिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.
कुंभ - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. कुटुंबीयांसह वेळ चांगला जाईल. घरातील वातावरण चांगले राहील. तन - मन उत्साही व आनंदी असेल. भावनात्मक विचारांचा दिवस आहे. नोकरीत सहकार्यांच्या मदतीने कार्य तडीस न्याल. कामानिमित्त पैसा खर्च होईल.
मीन - आज चंद्र कर्क राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल.