मेष - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. आजचा दिवस नवीन कामाचा आरंभ करण्यास अनुकूल नाही. प्रवासात अचानक संकटे येतील. क्रोध व वाणी ह्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.
वृषभ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. वैवाहिक सौख्याचा आनंद उपभोगता येईल. अचानक धनलाभ संभवतो.
मिथुन - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यपूर्ती व यश - कीर्ती प्राप्तहोईल. कुटुंबीयांसह आज आनंद, उल्हासपूर्ण वातावरणात सुखात वेळ घालवाल. आर्थिक लाभाची सुद्धा आज शक्यता आहे. महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. तरी सुद्धा आपण वाणी व क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. आपले मन दुखावले जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. त्याच बरोबर मान - सन्मान सुद्धा प्राप्त होतील. अपूर्ण कामे तडीस जातील.
कर्क - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल. खिन्नता जाणवेल. पोटदुखी, अपचन, अजीर्ण इ. व्याधींमुळे हैराण व्हाल. अचानक पैसा खर्च करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून मन दुखावले जाईल किंवा अबोला धरला जाईल. एकादी मानहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावा.
सिंह - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.
कन्या - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आज कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. भावंडाकडून फायदा होईल. शत्रूचा सामना करू शकाल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
तूळ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. संबंधितांशी मतभेद संभवतात. व्यवहारात हट्टीपणा सोडावा लागेल. प्रवासात अडचणी येतील. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद संभवतात. शक्यतो आज कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
वृश्चिक - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. प्रवास सुखद होतील. उत्तम वैवाहिक सुख उपभोगता येईल.
धनू - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. एखादा अपघात संभवतो. शारीरिक स्वास्थ्य बिघडेल. पैसा खर्च होईल.
मकर - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. सहल - प्रवास होतील. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल.
कुंभ - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज प्रत्येक कामात सहजपणे यश मिळू शकेल. मनःस्थिती आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या मर्जीमुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळतील. धनप्राप्ती होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगता येईल.
मीन - चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण मानसिक अस्वास्थ्यामुळे त्रस्त व्हाल. शरीरास थकवा व आळस जाणवेल. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. संततीची काळजी राहील. शक्यतो महत्वाचे निर्णय आज घेऊ नये. व्यापारात अडचणी येतील. मनात नकारात्मक विचार येतील.