मुंबई : जन्मकुंडलीतील 16 मे 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आजचा दिवस तुम्ही अत्यंत सावधपणे घालवण्याची गरज असून सर्दी, खोकला व ताप यामुळे तुमची प्रकृती आज बिघडेल. स्वकीयांचा वियोग होऊन परोपकारात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होण्याची आज शक्याता आहे. सबब सांभाळून राहण्याची गरज असून आज तुम्हाला मानसिक बेचैनी राहील. मांगलिक, सामाजिक कार्यावर आज तुम्हाला पैसा खर्च करावा लागल्याने मनस्ताप होण्याची शक्याता आहे.
वृषभ : आज तुमची प्राप्तीसह व्यापारात वाढ होऊन व्यापारात नवीन लाभदायक संपर्क वाढल्याने तुम्हाला आनंद होईल. कुटुंबीय, मित्रांसह हसण्याखेळण्यात क्षण घालवण्याची संधी मिळून प्रवासासह पर्यटनाचाही आज तुम्हाला योग येणार आहे. आज विशेषतः महिला वर्गाकडून लाभ होऊन वैवाहिक जोडीदाराशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊन जवळीक वाढल्याने तुम्ही आनंदीत असाल. भावंडांसह वडीलधार्यांकडून तुम्हाला लाभ होऊन शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
मिथुन : शरीरासह मनाने आज दिवसभर तुम्हाला प्रसन्नता राहून व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह आज वाढणार आहे. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळाल्याने समाजात तुम्हाला आज मानसन्मान प्राप्त होऊ शकतो. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवून नोकरीत पदोन्नतीची शक्यता असून सरकारी कामे सुद्धा सहजतेने पूर्ण होतील.
कर्क : आज तुम्ही मंगल कार्यासह परोपकारी कामात जास्त वेळ घालवून तुम्हाला एखादा प्रवास घडण्याची शक्यता आहे. शारीरिक, मानसिक दृष्ट्या प्रसन्न राहून तुम्हाला नशिबाची साथही आज मिळणार आहे. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवून विदेश यात्रेची संधी लाभणार आहे, त्यासह नोकरदारांना लाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह : आजचा दिवस तुम्हाला प्रतिकूल असून आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागण्याची शक्याता आहे. बाहेरचे खाणेपिणे टाळून आजारामुळे तुम्हाला आज खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडून कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहण्याची गरज आहे.
कन्या : आज सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात लाभाबरोबरच तुम्हाला प्रसिद्धी सुद्धा मिळून स्त्रीकडून विशेष लाभ होईल. दाम्पत्य जीवनात आज तुम्ही परमोच्च सुखाचे क्षण अनुभवणार असून नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधीही तुम्हाला मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री जुळणार असून आजचा दिवस भागीदारीसाठी तुम्हाला अनुकूल आहे, त्यासह प्रवास पर्यटनाची शक्यता आहे.
तूळ : आजचा दिवस तुम्हाला अत्यंत लाभदायक असून नोकरीत यश मिळून घरातील वातावरण सुखद राहणार आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला चांगले सहकार्य करणार आहेत. आजचा दिवस आर्थिक योजना बनवण्यासाठी अनुकूल असून परिश्रम तुम्हाला प्रगती पथावर नेतील, त्यासह संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील.
वृश्चिक : आज तुमच्या घरगुती जीवनात शांतीसह आनंदाचे वातावरण राहून आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी मित्रांचे सहकार्य पूर्णपणे मिळून मैत्रिणी भेटतील, त्यासह स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल.
धनू : आज तुमच्यात शारीरिक, मानसिक स्फूर्ती, उत्साहांचा अभाव राहिल्याने कुटुंबात क्लेश, कलहजन्य वातावरण राहून मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होऊन तुमच्या आईची प्रकृती बिघडण्याची शक्यात असल्याने काळजी घ्या, त्यासह सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. स्त्रीयांकडून हानी होण्याची शक्यता असल्याने नदी, तलाव, समुद्र आदींसह जलाशयांपासून सांभाळून राहण्याची आज तुम्हाला गरज आहे.
मकर : आजचा दिवस तुम्हाला खूप सुखात जाऊन अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने तुम्ही प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहून व्यापारात आर्थिक लाभ होऊन भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाऊन एखादे नवे कार्य तुम्ही आज सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होऊन मित्रांसह आप्तांच्या भेटीने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
कुंभ : आज तुमच्या द्विधा मनःस्थितीमुळे निर्णय शक्तीचा अभाव तुमच्यात जाणवणार असून त्यामुळे विपरीत परिणाम होईल. प्रकृती सुद्धा साथ देणार नसून वाणीवर ताबा न राहिल्याने वादविवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळून नाहक खर्चासह धनहानी होण्याची शक्यता आहे.
मीन : आज तुम्हाला आनंद, उत्साह, प्रसन्नतेचा अनुभव येण्याची शक्याता असून नवीन कार्यारंभ लाभदायक ठरणार आहे. मित्रांसह कुटुंबीयांच्यासोबत स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार असून आज तुमचा परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होऊन दाम्पत्य जीवनात सुख प्राप्ती होऊन कुटुंबात शांततेचे वातावरण पसरणार आहे.
हेही वाचा -