चंबा (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ताजे प्रकरण चंबा जिल्ह्यातून समोर आले आहे. चंबा जिल्ह्यातील टीसा ते बैरागढ या मार्गावर तरवाईजवळ एक बोलेरो वाहन १०० मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात ६ पोलीस कर्मचारी आणि एका चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ३ पोलीस कर्मचारी आणि एक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवाहरलाल नेहरू वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
![Himachal Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-08-2023/19238581_hp.jpg)
चालकाचा तोल गेल्याने अपघात झाला : हे बोलेरो वाहन बैरागढहून सनवलच्या दिशेने जात होते. अपघात झाला त्यावेळी वाहनात ११ लोक होते, ज्यापैकी ९ हिमाचल पोलीस कर्मचारी होते. बोलेरो वाहन तारवईजवळ येताच वाहनाचा अचानक तोल गेला आणि ते खोल नाल्यात पडले. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर नाल्याच्या जोरदार प्रवाहात चार जण वाहून गेले. जखमींना आधी तिसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तेथून त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय चंबा येथे दाखल केले गेले.
![Himachal Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11-08-2023/19238581_hp1.png)
मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला : घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. हा अपघात कसा झाला, याची कसून चौकशी केली जात आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. 'चंबा जिल्ह्यातील तीसा-बैरागढ मार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात पोलीस कर्मचारी आणि चालकाचा मृत्यू, तर इतर लोक जखमी झाल्याची दुःखद बातमी मिळाली. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थना करतो', असे ते आपल्या शोक संदेशात म्हणाले. जखमींना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
दोषींवर कारवाई करण्याची मागणी : घटनेची माहिती मिळताच चुरा विधानसभेचे आमदार हंसराज यांनी घटनास्थळी पाहणी करून लोकांशी संवाद साधला. 'यापूर्वीही आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी अनेकदा मागणी केली होती. त्यांच्या दुर्लक्षामुळेच हा अपघात झाला आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी', अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा :