ETV Bharat / bharat

Sameer Wankhede Bribery Case : दिल्ली उच्च न्यायालयाचा समीर वानखेडेंना दिलासा; पाच दिवस अटकेपासून संरक्षण - लाच मागितल्याचा ठपका

एनसीबीच्या अहवालावरुन मुंबई विभागाचे तत्कालिन संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचेही दिल्ली उच्च न्यायालयाने सूचवले आहे.

Sameer Wankhede Bribery Case
समीर वानखेडे
author img

By

Published : May 18, 2023, 9:08 AM IST

Updated : May 18, 2023, 9:48 AM IST

नवी दिल्ली : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात वाचवण्यासाठी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी समीर वानखेडे यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयात धाव घेतली असून दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सक्तीच्या कारवाईपासून समीर वानखेडे यांना संरक्षण दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. समीर वानखेडे यांना दिल्ली न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयात जाण्यासही बजावले आहे.

  • Today Delhi High Court granted protection from arrest (No coercive action) till May 22 to former Zonal Director, NCB Mumbai Sameer Wankhede with liberty to approach the Bombay High Court for further relief.

    Wankhede moved Delhi HC seeking cross FIR against Deputy DG NCB… pic.twitter.com/1mHgZHWFWw

    — ANI (@ANI) May 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सीबीआयने बोलावले होते चौकशीसाठी : कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांनी छापेमारी केली होती. यावेळी त्यांनी अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला वाचवण्यासाठी 25 कोटी रुपयाची लाच मागितल्याचा ठपका एनसीबीच्या समितीने ठेवला होता. याप्रकरणी एनसीबीच्या अहवालावरुन समीर वानखेडे यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्याला समीर वानखेडे यांनी वकील शुभी श्रीवास्तव यांच्या माध्यमातून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन अटकेपासून संरक्षण मागितले होते. यावेळी न्यायमूर्ती विकास महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देत समीर वानखेडे यांना दिलासा दिला आहे. सीबीआयने पाच दिवसांसाठी समीर वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिल्याची माहिती त्यांच्या वकिलाकडून देण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील दयान कृष्णन हजर झाले होते.

आर्यन खान आढळला होता ड्रग्ज प्रकरणात : बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात एनसीबीने एटक केली होती. त्याला ड्रग्ज प्रकरणात अडकवू नये म्हणून 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) समीर वानखेडेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आर्यन खानला एनसीबीने NCB ने 3 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर अटक केली होती. तीन आठवड्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानला जामीन मंजूर केला. एनसीबीला आर्यन खानवरील आरोप सिद्ध करण्यात अपयश आले.

एनसीबीने ठेवला समीर वानखेडेंवर ठपका : एनसीबीच्या तक्रारीवरून सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांवर कथित गुन्हेगारी कट रचून खंडणीचा ठपका ठेवला आहे. त्याशिवाय धमकी आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने एनसीबी ( NCB ) मुंबई झोनला ऑक्टोबर 2021 मध्ये खाजगी क्रूझ जहाजावरील विविध व्यक्तींकडून अंमली पदार्थांचे सेवन आणि ड्रग्ज पार्टीबाबतची माहिती मिळाली होती. त्यामुळे एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी कट रचून कथित आरोपींकडून लाचेच्या रूपात अनुचित फायदा मिळवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

झोनल डायरेक्टरच्या देखरेखीखाली नोंदवला गुन्हा : एनसीबी मुंबई झोनच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी प्रकरण क्रमांक 94/2021 मधील कथित आरोपीकडून फायदा मिळवण्यासाठी कट रचला. तत्कालीन झोनल डायरेक्टरच्या देखरेखीखाली गुन्हा नोंदणी आणि तपास केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एनसीबीच्या मुंबई झोनने इतरांसोबत गुन्हेगारी कट रचला होता. त्यानंतर कथित आरोपींकडून लाचेच्या स्वरूपात अवाजवी फायदा मिळवल्याचेही सीबीआयच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. कथित आरोपींच्या कुटुंबियांना धमकी देऊन 25 कोटी रुपये लुटण्यासाठी या व्यक्तींनी कट रचल्याचा आरोप आहे. तत्कालीन विबागीय संचालकांच्या कथित निर्देशानुसार अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे.

एनसीबीने दाखल केले 6 हजार पानांचे आरोपपत्र : एनसीबीने 27 मे 2022 रोजी आर्यनला क्लीन चिट दिली होती. ड्रग्ज ऑन क्रूझ प्रकरणात 14 आरोपींविरुद्ध 6 हजार पानांचे आरोपपत्र एनसीबीकडून दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पुरेशा पुराव्याअभावी आरोपपत्रात आर्यन आणि इतर पाच जणांची नावे नसल्याचे स्पष्ट केले होते. क्रूझ जहाजातून कथित ड्रग जप्त केल्याच्या चौकशीत अनेक त्रुटी आढळल्यानंतर एनसीबीने देखील चौकशी सुरू केली होती. क्रूझवर छापा टाकला तेव्हा भारतीय महसूल सेवेचे अधिकारी समीर वानखेडे हे मुंबई झोनल युनिटचे संचालक होते.

हेही वाचा -

  1. Mafia Mukhtar Ansari : माफिया मुख्तार अन्सारी 14 वर्षे जुन्या खुनाच्या प्रकरणातून निर्दोष मुक्त
  2. Passenger Smoking In Flight : विमानात धूम्रपान केल्याप्रकरणी प्रवाशावर गुन्हा दाखल
  3. Siddaramaiah Elected As New CM : कर्नाटक मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला; अखेर सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ

Last Updated : May 18, 2023, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.