ETV Bharat / bharat

Health Tips : शिंगाड्याचे फळ खाल्ल्याने 'हा' आजार होईल कमी - Water Chestnut

सर्वजण हंगामी फळे खातात. हिवाळ्यात शिंगाडे (वॉटर चेस्टनट - Water chestnut) खाणे इतर हंगामी फळांप्रमाणेच तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हिवाळी हंगाम सुरू होताच बाजारात शिंगाड्याची (Water Chestnut) विक्री सुरू झाली आहे. लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी शिंगाडे खूप फायदेशीर ठरते. चला जाणून घेऊया शिंगाडे खाण्याचे फायदे.

Water chestnut
शिंगाडे
author img

By

Published : Oct 24, 2022, 4:27 PM IST

हिवाळा सुरू होताच बाजारात शिंगाड्याची (Water chestnut) विक्री सुरू होते. शिंगाडे ही जलचर भाजी आहे. त्याला इंग्रजीत 'वॉटर चेस्टनट' किंवा 'वॉटर कॅल्ट्रॉप' म्हणतात. पोषक तत्वांनी युक्त शिंगाड्याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन-ए, सी, कार्बोहायड्रेट्स, प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. हे कच्चे, उकडलेले किंवा खीर बनवून खाल्ले जाते. त्याच वेळी, शिंगाड्याचे पीठ देखील उपवासात खाल्ले जाते. चला जाणून घेऊया शिंगाडे खाण्याचे फायदे.

शिंगाडा खाण्याचे फायदे ( Benefits of water Chestnut) : फायबर्समुळे पोट नियमित साफ होते, रक्तातील साखर नियंत्रित राहते. शिवाय फायबर्समुळे विविध कँसर, हार्ट अटॅक, मधुमेह यांचा धोका कमी होतो. याशिवाय गरोदरपण, मूळव्याध, कावीळ आणि दमा यामध्येही शिंगाडा खाणे फायदेशीर असते.

आहारतज्ञांच्या मते, लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी शिंगाड्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला लो बीपीची समस्या असेल तर तुम्ही रॉ शिंगाडे खाऊ शकता. त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते, जे कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याचे नियमित सेवन केल्याने बीपीच्या रुग्णांना खूप फायदा होतो.

शिंगाड्याचे (water Chestnut) सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरत दूर होते. त्याचबरोबर पोटाच्या समस्यांवरही फायदेशीर ठरते. शिंगाडा शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शिंगाड्याचे सेवन करावे. हृदयविकाराच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शिंगाड्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. तसेच रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही यातील पोषक घटक मदत करतात.

शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते घशाच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करते. घसा खवखवणे आणि टॉन्सिलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शिंगाड्याचा उपयोग नक्की करून पहा.

शिंगाड्याचे पाणी शरीरातील कमजोरी दूर करण्यास मदत करते. एवढेच नाही तर, दात आणि हाडं मजबूत करण्याचे कामही हे फळ सहजतेने करते. यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळते, ज्यामुळे ते दात आणि हाडांसाठी चांगले मानले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.