ETV Bharat / bharat

Education Department: 'उठा, उठा सकाळ झाली..' मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारांतून आवाज देत पहाटे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उठवणार..

Education Department: हरियाणा शिक्षण विभागाने बोर्डाच्या परीक्षेसाठी विशेष योजना तयार केली आहे. सकाळी साडेचार वाजता मंदिर, मशिदी, गुरुद्वारातून घोषणा देऊन विद्यार्थ्यांना उठवले Announcement From Mandir Masjid Gurudwara जाईल, असे नियोजन शिक्षण विभागाने केले announcement for students in haryana आहे. जेणेकरून ते सकाळी अभ्यास करून चांगल्या क्रमांकाने पास होऊ शकतील. Haryana Education Department,

Haryana Education Department planned to make announcements in temples, mosques and gurudwaras to wake up students in morning for studies
मंदिर, मशिदी आणि गुरुद्वारांतून आवाज देत पहाटे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उठवणार..
author img

By

Published : Dec 23, 2022, 4:44 PM IST

चंदीगड (हरियाणा) : Education Department: हरियाणामध्ये, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दररोज सकाळी मंदिरे, मशिदी आणि गुरुद्वारांमधून घोषणा Announcement From Mandir Masjid Gurudwara करून अभ्यासासाठी उठवण्यात येणार आहे. बोर्डाच्या परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा शिक्षण विभागाने हा नवीन मार्ग शोधला आहे. पहाटे साडेचार वाजता धार्मिक स्थळांवरून घोषणा देऊन विद्यार्थ्यांना जागे केले announcement for students in haryana जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याने सकाळी 5:15 वाजता अभ्यास सुरू करावा.Haryana Education Department

त्यानंतर शिक्षक व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कोणता विद्यार्थी अजून जागे झाला आहे की नाही यावर लक्ष ठेवणार आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना पहाटे अडीच ते तीन तास अभ्यास करता येईल, अशी शिक्षण विभागाची योजना आहे. सुरुवातीला ही योजना 10वी आणि 12वी बोर्ड वर्गासाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी दहावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हिवाळी सुट्टी मिळणार नाही. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विद्यार्थ्यांचे वर्ग असतील.

Haryana Education Department,
शिक्षण विभागाचे परिपत्रक

शिक्षण विभाग गावातील पंचायत सदस्यांना संपूर्ण गावात सकाळी लवकर शिक्षणाचे वातावरण तयार करण्याचे आवाहन करेल. याअंतर्गत सकाळी धार्मिक स्थळांवरून घोषणा दिल्या जाणार आहेत. जेणेकरून विद्यार्थी उठून अभ्यासाला लागतील. यामुळे विद्यार्थ्यांना दररोज 2 ते 3 अतिरिक्त तास अभ्यास होईल. शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, यंदा हरियाणा बोर्डाच्या परीक्षेसाठी इयत्ता 10वीमध्ये सुमारे 1.95 लाख आणि 12वीमध्ये 1.75 लाख उमेदवार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.