नवी दिल्ली : नासाच्या शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या ग्रहावरील जीवसृष्टीला एक नवीन प्रकारचा धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वाच्या पसाऱ्यात सूर्यासारखे असंख्या तारे आहेत. त्यातील अनेक तारे हे मृतावस्थेमध्ये गेले असून त्यांच्या अंतिम काळात स्फोट झाल्यानंततर त्यांच्यातून अनेक प्रकारचे विषारी वायू आणि किरणे बाहेर पडत असतात. स्फोट झालेल्या ताऱ्यांमधून येणारे प्रखर क्ष-किरण अतिशय धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
शंभर प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहांवरही याचा परिणाम जाणवेल, असे सांगण्यात येत आहे. नासाच्या चंद्र क्ष-किरण वेधशाळेसह अनेक खगोलशास्त्रीय वेधशाळांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ते या निष्कर्षावर शास्त्रज्ञ आले आहेत. प्रचंडा ऊर्जास्रोत असलेला एक महाकाय तारा एका प्रचंड स्फोटात फुटतो. याला सुपरनोव्हा म्हणतात. या प्रक्रियेत, तारा त्याच्या सभोवतालच्या परिसरात दाट वायू बाहेर टाकतो. यातून असे काही घडत राहते की शास्त्रज्ञांनी याबद्दल सांगितले, क्ष-किरण मोठ्या प्रमाणावर पृथ्वीसारख्या ग्रहांपर्यंत पोहोचू शकतात. यास काही महिने किंवा दशके लागू शकतात. या क्ष-किरणांच्या प्रभावामुळे संबंधित ग्रहावरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्या किरणांमुळे ओझोनचा थरही संपुष्टात येईल असेही ते म्हणाले. त्यामुळे धोकादायक अल्ट्राव्हायोलेट किरण यामुळे थेट जमिनीवर पोहोचतात. यामुळे विपरीत घटनांची मालिका सुरू होते. त्यातच अखेरीस एखाद्या ग्रहावरील जीवनाचा नाश होईल असा धोका वर्तवण्यात आला आहे.
पृथ्वीवर आधीच लोकांनी प्रदुषण केल्याने अनेक विपरीत गोष्टी होत आहेत. त्यातच आता नासाच्या शास्त्रज्ञांनी असा प्रकारचा धोका वर्तवल्याने चिंता वाढल्या आहेत. विशेष म्हणजे हे फुटणारे तारे पृथ्वीपासून अनेक किंबहुना शेकडो प्रकाशवर्षे दूर आहेत. मात्र त्यांच्यापासून निघणाऱ्या विषाक्त गोष्टींचा लगेच परिणाम होत नसला तरी कालांतराने या फुटलेल्या ताऱ्यांमधून निघालेल्या विषाक्त द्रव्यांचा तसेच किरणांचा पृथ्वीवसियांनाही धोका असल्याचा इशारा यानिमित्ताने शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे आजच्या घडीला सर्वकाही उत्तम चालले असले तरी कालांतराने काही वेगळे होईल याचे काही आताच सांगता येणार नाही याची जाणीव शास्त्रज्ञांना झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे.